अभूतपूर्व अपयशाचं खापर फोडण्यासाठी अजून डोकी सामिल करतायत - काँग्रेस

'या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलींग शिवाय अधिक काम असणार नाही'
अभूतपूर्व अपयशाचं खापर फोडण्यासाठी अजून डोकी सामिल करतायत - काँग्रेस

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार (modi govt Reshufflle) होणार आहे. महाराष्ट्रातून तीन ते चार जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. यामध्ये नारायण राणे, (narayan rane) कपिल पाटील (kapil patil) आणि हिना गावित ही नावं आघाडीवर आहेत. मंत्रिमंडळाच्या या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून (congress) मात्र टीका करण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीकेची तोफ डागली आहे. (Congress leader sachin sawant slam modi govt Reshufflle)

"आपल्या अभूतपूर्व अपयशाचे खापर फोडण्यासाठी काही अजून डोकी सामिल करत आहेत" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करत आहेत. "देश आज अनेक समस्यांचा सामना करतोय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि डळमळीत अर्थव्यवस्था अशी अनेक संकट आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही उपयोग होणार नाही" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

अभूतपूर्व अपयशाचं खापर फोडण्यासाठी अजून डोकी सामिल करतायत - काँग्रेस
BLOG: वार झेलणारा शिवसैनिक आता शिवसेनेविरोधातच उभा ठाकणार?

"या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलींग शिवाय अधिक काम असणार नाही. त्यामुळे एक खुर्ची आणि अर्ध्या स्टूलवर बसलेल्या मोदी व शाहना आम्ही प्रश्न विचारत राहू. त्यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरूध्द लढण्याचे नियोजन करण्यास वेळ नाही" अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

अभूतपूर्व अपयशाचं खापर फोडण्यासाठी अजून डोकी सामिल करतायत - काँग्रेस
दुबईवरुन परतलेल्या तरुणीची आत्महत्या, प्रियकर आणि त्याच्या पत्नी विरोधात तक्रार

"सर्वपक्षीय बैठक बोलावयाला वेळ नाही. पण दलबदलू व सत्तेसाठी हपापलेल्यांसाठी मंत्रीमंडळ विस्ताराचा खेळ अशा संकटकाळी मांडायला वेळ आहे हे स्पष्ट दिसून येते. हाच मोदी सरकारचा खरा चेहरा आहे. मोदी सरकारच्या सत्तेच्या खेळाशी जीवनमरणाचा संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाचे कोणतेही घेणंदेणं नाही" असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com