esakal | BLOG: वार झेलणारा शिवसैनिक आता शिवसेनेविरोधातच उभा ठाकणार?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP appointed may narayan rane as MLC in maharashtra

BLOG: वार झेलणारा शिवसैनिक आता शिवसेनेविरोधातच उभा ठाकणार?

sakal_logo
By
दीनानाथ परब

वर्गात १०० विद्यार्थ्यांना (students) शिकवत असताना एक विद्यार्थी सर्वच शिक्षकांच्या कायम लक्षात राहतो. या विद्यार्थ्याचा खोडकरपणा, मस्तीखोरपणा त्याची हुशारी ही गुणवैशिष्ट्य (quality) त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. राजकारणाच्या (politics) शाळेतला असाच एक विद्यार्थी म्हणजे नारायण तातू राणे. सत्ता असो वा नसो, पद असलं काय किंवा नसलं काय? नारायण राणे हे नाव नेहमीच चर्चेत असतं. सभेच्या व्यासपीठावर नारायण राणे (narayan rane) हे नाव दिसंल की, राजकारणातली जाणकार मंडळी आवर्जून तिथे राणेंना ऐकण्यासाठी थांबतात. कारण राणे काय बोलणार? त्यांच्या शब्दांचे बॉम्ब कसे आणि कोणावर बरसणार, याची एक उत्सुक्ता असते. (Modi cabinet Reshufflle from Maharashtra former shivsainik & cm narayan rane could be induct into new cabinet)

आपल्या शब्द बाणांनी जसे ते विरोधकांना नामोहराम करु शकतात, तसंच ते स्वकीयांनाही घायाळ करु शकतात. हेच राणेंच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. कोकणी माणसामध्ये त्या मातीचा गुण असतो. राणेंचं सुद्धा अगदी तसंच आहे. निष्ठा, स्पष्टवक्तेपणा, दिलेला शब्द पाळणं आणि अन्यायाविरोधात चीड ही कोकणी माणसाची सर्व गुणवैशिष्ट्य नारायण राणेंमध्ये आहेत. बाहेरुन कितीही कठोर वाटला तरी, कोकणी माणसू हा आतून रसाळ फणसाच्या गऱ्यासारखा असतो. राणेंचही अगदी तसंच आहे. म्हणूनच कोकणात आणि त्यांना ओळखणारी माणसं त्यांना प्रेमाने 'दादा' म्हणतात. हेच 'दादा' म्हणजे नारायण राणे आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

नारायण राणेंच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली, तर खरोखरच त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलय. चेंबूर सुभाषनगरमध्ये राहणारे नारायण राणे ७० च्या दशकात इन्कम टॅक्स विभागात नोकरीला होते. शिवसेनेचा सुरुवातीचा तो काळ होता. त्यावेळी मुंबई-ठाणे पट्टयातल्या अनेक तरुणांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव निर्माण झाला होता. नारायण राणे हे नाव त्यापैकीच एक. नारायण राणे अनेकदा बोलताना, शिवसेनेसाठी मी वार अंगावर झेलले आणि शिवसेना वाढवली असं म्हणतात, ते अगदी खरय.

१९६८ साली शिवसेनेने त्यांच्याकडे चेंबूरच्या शाखाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी झोकून देऊन काम केले चेंबूर विभागात शिवसेना वाढवली. बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने पक्षप्रमुखांचा विश्वास संपादन केला. १९८५ साली नारायण राणेंना बाळासाहेबांनी महापालिका निवडणुकीचे तिकिट दिले. चेंबूरच्या कोपरगावमधून ते महापालिकेवर निवडून गेले. या दरम्यान त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपदही भूषवले. १९९० साली त्यांना विधानसभेचे तिकिट मिळाले. ती निवडणूक जिंकल्यानंतर राणेंनी कधीही मागे वळून बघितले नाही. शिवसेना जशी वाढत होती, तसे राणेही मोठे होत गेले.

हेही वाचा: दुबईवरुन परतलेल्या तरुणीची आत्महत्या, प्रियकर आणि त्याच्या पत्नी विरोधात तक्रार

शिवसैनिक, शाखाप्रमुख, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता असा त्यांनी प्रवास केला. पुढे शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात गेल्यानंतर त्यांना जमलं नाही. अखेर २००५ मध्ये ४० वर्षांनी त्यांनी शिवसेना सोडली. नारायण राणेंचं वेगळेपण म्हणजे शिवसेना सोडताना जे इतरांना जमलं नाही, ते राणेंनी करुन दाखवलं. शिवसेनेतून एखाद्या नेत्यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्याचे पोस्टर फाडणे, घर, कार्य़ालयांवर हल्ले असे प्रकार व्हायचे. राणेंनी प्रत्येक पावलावर जशास तसं उत्तर दिलं. त्यांच्यासोबत १० पेक्षा जास्त आमदार, कार्यकर्ते फुटले. त्यांना निवडणून आणलं.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपाला सर्वात मोठी संधी - देवेंद्र फडणवीस

पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही ते स्वस्थ बसले नाही. महसूल सारखं मोठं खातं त्यांना मिळालं. पण त्यांची महत्त्वकांक्षा मुख्यमंत्रीपदाची होती. त्यासाठी संधी मिळाली, तेव्हा त्यांनी प्रयत्न केले. पण काँग्रेसमध्ये अखेरपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणीच दिली. फक्त त्यांचं नाव प्रत्येकवेळी मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असायचं. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

मागच्या दोन वर्षांपासून ते भाजपासोबत आहेत. भाजपामध्येही त्यांना लगेच कुठलही पद मिळालं नाही. फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद दिलं जाईल, ही फक्त चर्चाच ठरली. भाजपामध्ये असताना अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेनेला अंगावर घेतलं. राणेंची हीच आक्रमकता आणि झटपट निर्णयक्षमतेमुळे आज त्यांना मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. पण राणेंना हे मंत्रिपद देताना पक्षविस्तार हेच भाजपाचं लक्ष्य असेल. एवढ मात्र निश्चित. कारण कोकणात २०१४ च्या आधी राणेंच वर्चस्व होतं. पण आता फक्त त्यांचा मुलगा देवगडमधून आमदार आहे. कोकणात भाजपाची पाळंमुळं बळकट करुन शिवसेनेला शह देण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल.

loading image
go to top