मोठी बातमी - काँग्रेसचा नेता म्हणतोय, "...तसं झाल्यास एका मिनिटात महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेर पडू" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - काँग्रेसचा नेता म्हणतोय, "...तसं झाल्यास एका मिनिटात महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेर पडू"

सोनिया गांधी यांनी जरी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला असला तरीही काँग्रेसचे अध्यक्षपद हे गांधी घराण्याकडे असावे.

मोठी बातमी - काँग्रेसचा नेता म्हणतोय, "...तसं झाल्यास एका मिनिटात महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेर पडू"

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्ष पदावरून मोठा गहजब माजलाय. एकीकडे काँग्रेसच्या २३ नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेलं पत्र आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार यामुळे काँग्रेसमध्ये आता अंतर्गत वाद विवाद सुरु झालेत. पात्र लिहीणार्या नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याचं देखील समजतंय. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय. या विधानाचा थेट संबंध महाराष्ट्रातील सत्तेशी आहे. 

सोनिया गांधी यांनी जरी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला असला तरीही काँग्रेसचे अध्यक्षपद हे गांधी घराण्याकडे असावे. पक्षाचे नेतृत्व गांधी परिवाराकडेच असावे, गांधी परिवाराकडे पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता आहे. असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत. 

मोठी बातमी - कोकणातून परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची 'या' मार्गांनाच पसंती

यासोबतच वडेट्टीवार म्हणालेत की, महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे ते सोनिया गांधी आणि मुळात राहुल गांधी यांच्या इच्छेनुसार स्थापित झाले आहे. अशात जर उद्या राहुल गांधी यांना महाराष्ट्रात काँग्रेसने सरकारबाहेर पडावे असं वाटलं, तर आम्ही एका मिनिटाचाही विचार न करता राज्यातील सत्तेतून तात्काळ बाहेर पडू. 

भाजपलाही लगावला टोला : 

याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपावरही निशाणा साधलाय. आमचा पक्ष लोकशाहीची  मूल्य पाळणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. केवळ दोघांनी निर्णय घायचा आणि बाकीच्यांनी तो ऐकायचा असं आमच्या पक्षात होत नसल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावलाय. 

congress leader vijay wadettiwar on congress president selection controversy

loading image
go to top