कोकणातून परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची 'या' मार्गांनाच पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातून परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची 'या' मार्गांनाच पसंती

आता ५ दिवसांच्या गणपतींचं विसर्जन, गौरी आणि गणपतींच्या विसर्जनानंतर म्हणजे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

कोकणातून परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची 'या' मार्गांनाच पसंती

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : यंदा कोरोनामुळे सर्वच सणांवर गदा आलीये. दरवर्षीप्रमाणे यंदा एकही उत्सव साजरा झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून कोकणात प्रवास करत असतात. गणपतीत कोकणात जाता यावं म्हणून चाकरमानी अनेक महिने आधीच ट्रेन्स किंवा बसेसचं बुकिंग करतात. मात्र यावेळेस कोरोनामुळे ट्रेन्स आणि बसेस बुकिंगचे पर्याय खुले नव्हेत. अगदी शेवटपर्यंत आपल्याला कोकणात जाता येणार की नाही याचीही चाकरमान्यांना शाश्वती नव्हती. त्यामुळे यंदा अनेकांनी स्वतःची सोय करत कोकण गाठलं. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या बसेस आणि ट्रेन्स रिकाम्या गेल्यात. मात्र आता परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांनी बसेस आणि ट्रेन्सने येणं पसंत केलंय. 

मोठी बातमी - 'निवृत्तीवेतनावर कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार' म्हणत हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

अनेकांना गणपतीसाठी कोकणात पूर्ण अकरा दिवस राहणं शक्य नसतं. अशात अनेक चाकरमानी एखाद दोन दिवसांनी म्हणजेच दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन उरकून पुन्हा मुंबईकडे येतात. याच धर्तीवर कालच्या दीड दिवसांच्या विसर्जनानंतर आज अनेकांचा परतीचा प्रवास सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी खासगी वाहनं किंवा बसेसऐवजी रेल्वे आणि एसटी गाडयांना पसंती दिली आहे. 

  • २ सप्टेंबपर्यंत एसटीच्या १८२ गाड्यांचे गट आरक्षित आहेत
  • १७५ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण झाले असून उर्वरित ४९८ गाड्यांचे आरक्षणही जवळ जवळ पूर्ण झालंय 
  • २७ ऑगस्टला ४३ गाड्या, २८ ऑगस्टला १९२ गाड्यांपैकी १५ गट आणि २७ वैयक्तिक बस आरक्षण पूर्ण झाले आहे.


मोठी बातमी -  सप्टेंबरनंतर कसा असेल लॉकडाऊन?, बुधवारी ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

आता ५ दिवसांच्या गणपतींचं विसर्जन, गौरी आणि गणपतींच्या विसर्जनानंतर म्हणजे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

people who traveled from mumbi to konkan for ganesh utsav preferes st and trains for return journey

loading image
go to top