esakal | मोर्चात काँग्रेस नेते, कार्यकर्ते बैलगाडीवरुन खाली पडले, अँटॉप हिल मधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

मोर्चात काँग्रेस नेते, कार्यकर्ते बैलगाडीवरुन खाली पडले, अँटॉप हिल मधील घटना

मोर्चात काँग्रेस नेते, कार्यकर्ते बैलगाडीवरुन खाली पडले, अँटॉप हिल मधील घटना

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: आतापर्यंत आपण अनेकदा निवडणूक प्रचाराच्यावेळी किंवा अन्य उद्घाटन कार्यक्रमाच्यावेळी सभा मंडप (stage) कोसळल्याचं पाहिलं आहे. क्षमतेपेक्षा जास्त नेते, कार्यकर्त्यांची गर्दी (crowd) स्टेजवर झाली की, त्या भाराने स्टेज कोसळतो. काहीवेळा अशा दुर्घटनांमध्ये नेते, कार्यकर्ते जखमी होतात. आज काँग्रेसने (cogress) मुंबईत मोर्चा (Mumbai morcha) काढला होता. त्यावेळी सुद्धा अशीच घटना घडली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. (congress leaders wokers fall from bullock cart in rally incident happened at antophill)

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चासाठी बैलगाडी आणली होती. बैलगाडीवर उभे राहून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी करत होते. पण मोर्चेकरांच्या वजनाने चक्क बैलगाडीच तुटली.

हेही वाचा: दोन महिलांना १ कोटी रुपयांना फसवणाऱ्या ज्योतिषी राम करंदीकरला अटक

अँटॉप हिल येथे बैलगाडीत उभे राहून गॅस सिलेंडर, इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी करत होते. आंदोलन सुरु असताना बैलगाडीत गर्दी इतकी वाढली की, त्या वजनाच्या भाराने बैलगाडी तुटली. सुदैवाने या मध्ये कोणालाही दुखावत झालेली नाही.

loading image