esakal | दोन महिलांना १ कोटी रुपयांना फसवणाऱ्या ज्योतिषी राम करंदीकरला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Nilkanth Karandikar

दोन महिलांना १ कोटी रुपयांना फसवणाऱ्या ज्योतिषी राम करंदीकरला अटक

sakal_logo
By
नरेश शेंडे

मुंबई: स्वत: संख्याशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी (Numerologist and Astrologer) असल्याचा दावा करणाऱ्या एका ५७ वर्षीय नागरिकाने मालाडच्या (Malad) दोन महिलांना १ कोटी रुपयांना गंडा (One Crore Fraud) घातला आहे. राम नीलकंठ करंदीकर (Nilkanth Karandikar) असं या नागरिकांच नाव आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन महिलांनी मालाड पोलिस स्टेशनमध्ये (Malad Police station) करंदीकरने त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार (Police Complaint) दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी करंदीकरला संपर्क साधला होता. मात्र, करंदीकर फरार असल्याचे पोलिसांनी कळले. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक विवेक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने (Police Team) शोधमोहिम सुरु केली. अखेर पोलिसांनी करंदीकरला मुलुंड येथे शोधलं व त्याला बुधवारी अटक केली. (Self professed Numerologist and Astrologer Nilkanth Karandikar arrested for one crore rupees fraud )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम करंदीकर यांचे वडील अध्यात्मिक गुरु होते. त्यांचे अनुयायी वर्गही मोठा होता. पण करंदीकरने त्यांच्या नावाचा गैरवापर करुन लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोन महिलांनी करंदीकरने त्यांची फसवणूक केल्याबद्दल पोलिसांना कळवलं. एका महिलेने करंदीकरला १५ लाख रुपये व्याजावर दिले होते. करंदीकरने त्या रक्कमेवर वर्षाला १२ टक्के व्याज देण्याचे आश्वासन त्या महिलेला दिले होते. तर दुसऱ्या महिलेने करंदीकरला ५० लाख रुपये व ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले होते. मात्र, दिलेले पैसे परत देण्याची मुदत संपल्यानंतर करंदीकर त्या महिलांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.

हेही वाचा: हॉस्पिटलमध्येच डॉक्टरचा नर्सवर जबरदस्तीचा प्रयत्न, नालासोपाऱ्यातील घटना

याप्रकरणी महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर करंदीकरला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी महिनाभरात मी सर्व पैसे परत देईन, असे वचन करंदीकरने दिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी करंदीकरला जानेवारीत संपर्क साधला असता त्याचा फोन बंद होता. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याच्याबद्ल काहीच माहिती नसल्याचा दावा केला होता.

''पोलीस उपनिरिक्षक विवेक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शोधमोहिम सुरु केली. करंदीकरला मुलुंड येथे शोधण्यात आलं. याप्ररणी त्याला बुधवारी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.'' अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक धनंजय लिगाडे यांनी दिली आहे.

loading image