काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वादळग्रस्तांना आश्वासन, म्हणालेत...

काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वादळग्रस्तांना आश्वासन, म्हणालेत...

अलिबाग : प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे निसर्ग चक्रीवादळात जीवितहानी कमी प्रमाणात झाली; मात्र घरांची, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपतीमध्ये मोडलेले संसार उभे करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. पुढील काही दशके या वादळाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याने यातून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची गरज असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रायगड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यात म्हटले आहे.

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते नागाव येथे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल आणि काशिद समुद्रकिनाऱ्याची गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करताना बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व नुकसानग्रस्त उपस्थित होते.

यानंतर थोरात यांनी मुरूड तालुक्यातील काशीद व नंतर मुरूड येथे भेट देऊन श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दुपारी 2.30 वाजता महसूलमंत्री अधिकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी त्यांनी केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

पन्नास हजार रुपये एकरी जाहीर केलेली मदत येथील परिस्थितीनुसार कमी पडणार असल्याचे मत व्यक्त करून बागायतदारांना उभे राहण्यासाठी भविष्यात शेतसारा कमी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. येथील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मांडलेल्या मागण्या मंत्रिमंडळात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काशीद येथून आगरदांडा आणि तेथून रो-रो बोटीने दिघी बंदराकडे थोरात यांनी निवडक अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली.

congress minister balasaheb thorath on konkan visit after nisarga cyclone 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com