उपनगरातून मुंबईत येणाऱ्या कोविड योध्यांना मुंबईतच राहण्याची व्यवस्था करावी, याचिकेवर हायकोर्टाने घेतला महत्त्वाचा निर्णय...

उपनगरातून मुंबईत येणाऱ्या कोविड योध्यांना मुंबईतच राहण्याची व्यवस्था करावी, याचिकेवर हायकोर्टाने घेतला महत्त्वाचा निर्णय...

मुंबई: कोरोनाचा सामना करणाऱ्या कोरोना योद्धांचे कर्तव्य बजावण्यासाठी कौतुक करायला हवे. ते मुंबईमध्ये येऊन प्रवास करतात म्हणून त्यांना वेगळे ठेऊ नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे. मुंबईत येणाऱ्या कोरोना योध्दांना मुंबईतच राहण्याची व्यवस्था करावी म्हणजे मुंबई बाहेर संसर्गाचा धोका वाढणार नाही, असा दावा करणारी जनहित याचिकाही न्यायालयाने नामंजूर केली.

वसईमध्ये राहणाऱ्या चरण भट यांनी एड. उदय वारुजीकर यांच्या मारफत याचिका केली होती. मुंबईमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. मात्र मुंबई बाहेरून वसई, ठाणे, कल्याण आदी भागातून डॉक्टर, पोलिस आणि प्रशासकीय कर्मचारी रोज मुंबईमध्ये येत आहेत. ते पुन्हा संध्याकाळी त्यांच्या घरी परततात. यामुळे त्यांना आणि त्यांच्या परीवाराला कोरोनाचा धोका संभवतो, त्यामुळे अशा योद्धांना मुंबई तात्पुरती निवासस्थाने द्या, अशी मागणी याचिकेत केली होती. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. ए ए सय्यद यांच्या खंडपीठाने ही याचिका नामंजूर केली. राज्य सरकारने याचिकेला विरोध केला होता.

आताच्या परिस्थितीमध्ये व्यक्तिगत भीतीपेक्षा सार्वजनिक हित पाहणे जास्त आवश्यक आहे. कोरोना योद्धांना अत्यावश्यक सेवेत असल्याने कामावर येण्याचे बंधन आहे. प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्न करीत आहे आणि कोरोना योद्धाही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, पण ही सध्याची गरज आहे. त्यांच्या कुंटुंबियांची त्यांना देखील काळजी आहे आणि त्यासाठी ते खबरदारी घेत असतात. मात्र त्यांना कुटुंबापासून वेगळे ठेवणे योग्य नाही, त्यापेक्षा निडरपणे आणि प्रतिबंध न करता त्यांना काम करु द्यायला हवे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

mumbai high court dismissed petition filed to prohibit covid yoddhas to mumbai and go back in suburbs 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com