महाशिवआघाडीचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी एकत्र येणार?

सागर आव्हाड
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उद्या शिवतीर्थावर येणार असून, महाशिवआघाडीचे पदाधिकारीही उपस्थित राहतील, ते ही प्रथमच. त्यामुळे उद्याच्या दिनाला महत्त्व आले आहे. ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ अशी घोषणा देत हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण केलेल्या बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून असंख्य हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर उद्या शिवतीर्थावर उसळणार आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (रविवार) स्मृतीदिन आहे. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत असून, उद्या शिवतीर्थावर दर्शनसाठी आघाडीचे नेते येणार का, याबाबत उत्सुकता आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उद्या शिवतीर्थावर येणार असून, महाशिवआघाडीचे पदाधिकारीही उपस्थित राहतील, ते ही प्रथमच. त्यामुळे उद्याच्या दिनाला महत्त्व आले आहे. ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ अशी घोषणा देत हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण केलेल्या बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून असंख्य हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर उद्या शिवतीर्थावर उसळणार आहे.

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

शिवसेनेशी सूर जुळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेते यानिमित्त शिवतीर्थावर जातील अशी दाट शक्यता आहे. या तिन्ही पक्षांच्या  नेत्यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली होती. यामध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा  झाली होती. आता उद्याच शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक होणार आहे. त्यानंतर महाशिवआघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. 

'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP leaders may be tribute to Shivsena chief Balasaheb Thackeray