

BMC Election VBA Candidate Against Congress
ESakal
काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात युतीची घोषणा झाली असली तरी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत राजकीय उलटफेर दिसून येत आहे. पाच वॉर्डांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांतच, वंचितने मुंबईतील पाच वॉर्डांमध्ये आपले उमेदवार कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.