"मतदारयाद्यातील घोळाची माहिती काँग्रेस शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला मागितली तरी ते देण्यास टाळाटाळ करत आहेत."
मुंबई : विधानसभेत मतांची चोरी करून भाजप युतीचे ‘फिक्सिंग’ सरकार सत्तेत आले आहे, असा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. मतदारांना जागृत करून मतदारयाद्यांमधील गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती मोहीम हाती घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी दिली.