
ठाणे : खाजगी कंपनी या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्याने भविष्यात गरीब जनतेला याचा भुर्दंड सोसावा लागेल. प्रशासन महावितरणच्या खाजगीकरणाबाबत घेत असलेल्या निर्णयाला तसेच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे, या मागणीसाठी ठाणे काँग्रेसच्यावतीने बुधवारी महावितरणच्या वागले येथील मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. यावेळी वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची,अदानी हटाव देश बचाव अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.