काँग्रेसचे जरकीहोली यांच्या वक्तव्याचा डोंबिवलीत भाजपाने केला निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Protest by BJP

कर्नाटकचे काँग्रेस चे पदाधिकारी सतीश जरकीहोली यांनी हिंदू हा पारशी शब्द असून त्याचा अर्थ चांगला नसल्याचे वक्तव्य केले होते.

काँग्रेसचे जरकीहोली यांच्या वक्तव्याचा डोंबिवलीत भाजपाने केला निषेध

डोंबिवली - कर्नाटकचे काँग्रेस चे पदाधिकारी सतीश जरकीहोली यांनी हिंदू हा पारशी शब्द असून त्याचा अर्थ चांगला नसल्याचे वक्तव्य केले होते. जरकीहोली यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भारतीय जनता पक्ष डोंबिवली यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जरकीहोली यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

डोंबिवली इंदिरा गांधी चौक येथे शुक्रवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टी डोंबिवली मंडळ यांच्या वतीने काँग्रेसचे कर्नाटकचे पदाधिकारी जरकीहोली यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

काँग्रेसची सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. एकीकडे भारत जोडो सुरू असताना दुसरीकडे त्याच पक्षातील काही लोक भारत तोडत आहेत. त्याच पक्षातील पदाधिकारी जरकीहोली यांनी हिंदू शब्दा विरोधात वक्तव्य केले आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली पाहिजे अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी केली.