esakal | काँग्रेस प्रवक्त्याच्या भावाला 'या' गंभीर आरोपाखाली अटक, सचिन सावंतांनी दिलं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

काँग्रेस प्रवक्त्याच्या भावाला 'या' गंभीर आरोपाखाली अटक, सचिन सावंतांनी दिलं स्पष्टीकरण}

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या भावाला अटक करण्यात आली आहे. काँग्रेसनं या अटकेची दखल घेतली आहे.

mumbai
काँग्रेस प्रवक्त्याच्या भावाला 'या' गंभीर आरोपाखाली अटक, सचिन सावंतांनी दिलं स्पष्टीकरण
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. सुनीत याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. लोणावळा पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली ही अटक केल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीत वाघमारे याच्यावर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.  सुनीत वाघमारे याच्यावर मुंबईच्या भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा लोणावळा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, नोकरीचा शोध घेत असताना आपण सुनीत वाघमारे यांच्या संपर्कात आली. सुनीतने या महिलेला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिलं आणि फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर सुनीतनं आपला मोबाईल नंबर मागितला आपल्या नोकरीच काम करून देत असल्यामुळे आणि एकाच परिसरात राहत असल्यामुळे पीडित महिलेनं सुनीत वाघमारेला आपला नंबर शेअर केला. ज्या नंतर दोघांमध्ये व्हॉट्सअप चॅट आणि फोन कॉल सुरु झाले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काही दिवस झाल्यानंतर पीडित महिलेकडे सुनीतनं आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं म्हटलं. तसेच आपलं लग्न झालं आहे. मात्र आपला संसार नीट चालत नाही ज्यामुळे बायकोला घटस्फोट देणार आहे.  पीडित महिलेशी लग्न करणार असं आश्वासन सुनीतने पीडित महिलेला दिलं. सुरुवातीला पीडित महिलेने सुनीतला नकार दिला मात्र सुनीत वारंवार पीडित महिलेशी संपर्क साधू लागला. तिच्या कार्यालयामध्ये जाऊन तिला भेटू लागला जेणेकरून पीडित महिलेचा त्यावर विश्वास बसला.

आपला घटस्फोट होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला वकील भेटायला येत आहेत असं सांगितलं आणि सुनीत त्या पीडित महिलेला लोणावळामधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.  जिथे गेल्यानंतर त्या महिलेच्या लक्षात आलं की, त्यानं तिला खोटं सांगून हॉटेलवर आणलं आहे. त्या हॉटेलमध्ये सुनीत वाघमारेनं पीडित महिलेवर अतिप्रसंग केला. महिलेनं आपल्या तक्रारीत सुनीतनं अतिप्रसंग केल्याचं म्हटलं आहे. तसेच दोघे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिले होते, असंही तिनं म्हटलं आहे. 

हेही वाचा-  म्हणून भर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी मानले अजित पवार यांचे आभार 

त्यानंतर सुनीतनं पीडित महिलेला सांगितलं की, माझी पत्नी घटस्फोट देण्यास नकार देत आहे. असं सांगितल्यानंतर पीडित महिलेचे फोन आणि मेसेजला उत्तर देणं सुनीतनं बंद केलं. त्यानंतर पीडित महिलेच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे.  

ज्यानंतर महिलेने भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये सुनीत वाघमारे विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र सगळ्यात आधी हा गुन्हा लोणावळा येथे घडला होता. त्यामुळे भोईवाडा पोलिस स्टेशनमधून हा गुन्हा लोणावळा पोलिस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. गुन्हा वर्ग झाल्यानंतर त्याचा तपास लोणावळा पोलिसांनी सुरू केला आणि सुनीत वाघमारेला अटक केली.

सचिन सावंत यांचं स्पष्टीकरण

सुनीत वाघमारेला अटक झाल्यानंतर या अटकेची काँग्रेसने दखल घेतली. सुनीत यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. याबाबतचे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

Congress spokesperson Raju Waghmare brother arrested Sachin Sawant gave explanation