esakal | ऑपरेशन लोटसवर नाना पटोले यांनी दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

ऑपरेशन लोटसवर नाना पटोले यांनी दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया

राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. 

ऑपरेशन लोटसवर नाना पटोले यांनी दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु झाली. तसंच राजकीय तर्क वितर्क लढवले जाऊ लागलेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. 

राज्यात सत्ता बदल होणार नसून देशात बदल होणार आहेत. राज्यातील सत्ता पाच वर्षे टिकणार असल्याचा आम्हाला विश्वास असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

नाना पटोले १२ तारखेला पदभार स्विकारणार आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानावर हा कार्यक्रम असणार आहे. फडणवीस मित्र आहेत काहीही बोलतात. काही ऑपरेशन लोटस होणार नाही. भाजप पक्ष उरणार भविष्यात नाही, असंही पटोले यांनी म्हटलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पटोले यांनी मोदींच्या संसदेतील भाषणावरही वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलले ही नवीन बातमी आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून ते संसदेऐवजी बाहेर सभांमध्येच बोलतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

मनमोहनसिंह यांचं उदाहरण त्यांनी दिलं. मग जीएसटीचा कायदा जो मनमोहन सिंह यांनी आणला होता तो मोदींनी का आणला नाही. या देशातील पंतप्रधान खोटं बोलतात, ते पुन्हा खोटं बोलले आहेत, असंही ते म्हणालेत. महाराष्ट्राला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे ती भाजपने कायम राखावी, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- मुंबई, ठाण्यातल्या कोरोना संदर्भात समोर आली पॉझिटिव्ह बातमी

Congress state president Nana Patole Reaction Operation Lotus bjp amit shah

loading image