विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचा ५, ४, ३ चा फॉर्म्युला? म्हणून काँग्रेस नाराज ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

जसजसा लॉकडाऊन शिथिल होतोय तसतसं राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा आहेत आणि याच जागांवरून महाविकास आघाडीत एक नवा वाद निर्माण झालाय असं राजकीय विश्लेषक म्हणतायत

मुंबई - जसजसा लॉकडाऊन शिथिल होतोय तसतसं राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा आहेत आणि याच जागांवरून महाविकास आघाडीत एक नवा वाद निर्माण झालाय असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. एका वृत्तपराने दिलेल्या बातमीनुसार काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल नियुक्त जागा आणि महामंडळाच्या नेमणुकीसाठी नवी मागणी केल्याची माहिती समोर येतेय. आणि यासाठी काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय. 

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांवर समसमान वाटप व्हावं त्याचसोबत महामंडळांवर देखील समसमान वाटप केलं जावं अशी काँग्रेच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या आधी झालेल्या मंत्रिपदांचं वाटप हे आमदारांच्या संख्येवरून झालं होतं. मात्र इतर गोष्टी या समसमान वाटून घेण्याचं महाविकास आघाडीत ठरलं असल्याचं काँग्रेस नेत्यांकडून समजतंय, यामध्ये विधान परिषदेच्या जागांचाही समावेश असल्याचं समजतंय.

BIG NEWS - मुंबई पालिकेनं नितेश राणेंच्या ट्विटला 'असं' दिलं सडेतोड उत्तर...

मात्र आता विधानपरिषदेसाठीचा ५, ४, ३ चा फॉर्म्युला समोर येताना पाहायला मिळतोय. यामध्ये शिवसेना ५,  राष्ट्रवादी काँग्रेस ४ तर काँग्रेसला ३ जागा देण्याच्या चर्चा सुरु आहेत. आणि याच मुद्द्यावर काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. 

एकंदरच महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्याने काँग्रेस नेते नाराज आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. काल काँग्रेसने मुंबईत बैठक घेऊन त्याबाबत चर्चा केली. या बैठकीत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पाटोले, अशोक चव्हाण, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, सतेज पाटील हे सहभागी होते. 

congress unhappy over governor appointed MLC formula discussed in mahavikas aaghadi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress unhappy over governor appointed MLC formula discussed in mahavikas aaghadi