esakal | "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis

"लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाचं संकट गंभीर आहे. उपचार आणि औषधांअभावी अनेक रूग्ण अत्यावस्थ स्थितीत जात आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर याचा तुटवडा ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. त्याचदरम्यान, महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करायचा नाही अशी ताकीद केंद्र सरकारने इतर कंपन्यांना दिली असल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्याने केले. त्यानंतर रेमडेसिवीरचा मोठा साठा सापडलेल्या एका कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. या साऱ्या प्रकरणात भाजप नेत्यांनी राज्याचे नाव धूळीला मिळवले असं मत काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

हेही वाचा: मोदी सरकारवर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना भाजपकडून सडेतोड उत्तर

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रद्वेषी आहेत. मुंबईचे फायनान्स सेंटर त्यांनी अहमदाबादला नेले. देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात मॉडेलचे अनुकरण करताना महाराष्ट्र कसा मागे राहिल तेच पाहिलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फोन घ्यायला पंतप्रधानांना वेळ नाही, पण पश्चिम बंगाल निवडणुकीत प्रचार करायला त्यांना वेळ आहे. रेमडेसिवीर प्रकरणात भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचं नाक कापलं. एकदा लॉकडाऊन संपू दे. लॉकडाउन उठवल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करू", असा इशारा काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी दिला.

हेही वाचा: मुंबईकरांनी ऐकलं, लोकल प्रवास टाळला, पाहा ही आकडेवारी

"भाजपच्या लोकांनी शपथविधी रात्री घेतला, पण आता महाराष्ट्राला देण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही. आता एका फ्रुट कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी सारं काही सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्यामुळे गुन्हा दाखल करायला हवा. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यांनी केलेली पापं लपणार नाहीत. सुमारे पावणे पाच कोटी रुपयांचे रेमडेसिवीर औषध खरेदी केल्याचे भाजप नेते म्हणत आहेत. असं करता आलं असतं, तर अदानी, अबांनींनी ते आधीच खरेदी केले असते", असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा: महाराष्ट्रात दोन दिवसात संपूर्ण लॉकडाउनबद्दल होणार निर्णय

"मुंबईत जिल्हानुसार पक्षाने टास्क फोर्स स्थापन केल्या आहेत. या फोर्स सर्वसामान्य लोकांना कोरोनासंदर्भातील समस्यांसाठी मदत करतील. मुंबई काँग्रेसकडून 022 - 22621114 हा कोरोना समस्यांबाबत एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. याशिवाय, मुंबईतील सर्व जिल्ह्यात 108 नंबर म्हणजेच ambulance चाही नंबर मदतीसाठी वापरला जाईल", अशी माहिती त्यांनी दिली.