esakal | मुंबईकरांनी ऐकलं, लोकल प्रवास टाळला, पाहा ही आकडेवारी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई लोकल

मुंबईकरांनी ऐकलं, लोकल प्रवास टाळला, पाहा ही आकडेवारी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर मुंबई लोकलमध्ये अजूनही प्रवाशांची कशी गर्दी होतेय, ती दृश्ये दाखवली जात होती. निर्बंध घातले पण त्याचा काही फायदा होणार आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. लोकलमध्ये गर्दी कायम राहणार असेल, तर निर्बंधांचा फायदा नाही असा सार्वत्रिक सूर उमटत होता. पण आता समोर आलेली आकडेवारी खूपच वेगळी आहे. वृत्तवाहिन्यांवरील दृश्य आणि प्रत्यक्षातील वास्तव पूर्णपणे वेगळं आहे.

हेही वाचा: कोरोना बातम्यांवरुन बाळा नांदगावकरांचं चॅनल्सना महत्त्वाचं आवाहन

मागच्या काही दिवसात प्रथमच लोकलमधील प्रवासी संख्या २० लाखापर्यंत खाली आली आहे. लोकलला मुंबईची जीवनवाहिनी म्हटले जाते. कोरोनाच्या संकटाआधी दरदिवशी मुंबई लोकलमधुन ८० लाख नागरीक प्रवास करायचे.

मध्य रेल्वे मार्गावर सध्या प्रवासी संख्या ९ लाखापर्यंत खाली आली आहे. मध्य रेल्वेचा पल्ला मोठा असून प्रवासी संख्या जास्त आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी प्रवासी संख्या ११ लाख होती. मध्य रेल्वे मार्गावर १५ एप्रिलला प्रवासी संख्या १७.७ लाख होती. १६ एप्रिलला हीच प्रवासी संख्या १३.५ लाख आणि १७ एप्रिलला ९.३ लाख झाली अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. १७ एप्रिलला पश्चिम रेल्वेने ११.३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात दोन दिवसात संपूर्ण लॉकडाउनबद्दल होणार निर्णय

सध्या लोकल ट्रेनच्या फेऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नाहीय. ९५ टक्के क्षमतेने लोकल धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर १,६८६ फेऱ्या तर पश्चिम रेल्वे मार्गावर १,३०० फेऱ्या सुरु आहेत. कोरोनाविरुद्ध लढयात महाराष्ट्र सरकारने नवीन निर्देश जारी केले, तर त्याचे पालन करु असे अधिकाऱ्याने सांगितले,