ठरलं तर ! कॉंग्रेस मोफत पाण्याच्या मुद्द्यावर BMC निवडणूक लढणार

समीर सुर्वे
Wednesday, 6 January 2021

महाविकास आघाडी करुन महानगर पालिकेची निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस ठाम असून आगामी महापालिका निवडणुक झोपडपट्टी वासियांना मोफत पाणी देण्याच्या मुद्यावर लढली जाण्याची शक्यता आहे.तसे,संकेतच आज मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिले.

मुंबई : महाविकास आघाडी करुन महानगर पालिकेची निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस ठाम असून आगामी महापालिका निवडणुक झोपडपट्टी वासियांना मोफत पाणी देण्याच्या मुद्यावर लढली जाण्याची शक्यता आहे.तसे,संकेतच आज मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिले.
मुंबई कॉंग्रेस कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परीषदेत बोलताना भाई जगताप यांनी महापालिका निवडणुक स्वतंत्र लढण्याचा पुनरुच्चार केला.कॉग्रेसच्या वरीष्ट नेत्यांनीही महापालिका निवडणुक स्वतंत्र लढण्याबाबत भुमिका पटवून देऊ असेही त्यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागा स्वबळावर लढणारा कॉंग्रेस हा ,,कमेव पक्ष आहे.त्यासाठी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी पासून 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असून प्रभाग स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मरगळ झटकून आत्मविश्‍वास निर्माण केला जाणार आहे.असेही त्यांनी सांगितले.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांचा संपुर्ण मालमत्ता कर माफ व्हावा ही कॉंग्रेसची भुमिका आहे.त्याच बरोबर झोपडपट्टयांमधील नागरीकांची पाणीपट्टीही रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली.हाच मुद्दा कॉंग्रेस महापालिकेच्या निवडणुकीत तापवण्याची शक्यता आहे.मात्र,यामुळे पालिकेला वार्षिक 168 कोटी रुपयांचा तोटा होईल.पालिकेवर भार पडणारा असला तरी टॅंकरमाफीयांच्या शोषणातून झोपडपट्टी वासियांची मुक्तता होईल असेही त्यांनी नमुद केले.
महापालिका प्रशासन देत असलली मालमत्ता करातून सुट फसवी आहे.राज्य सरकारने 10 मार्च 2019 मध्ये अध्यादेश काढून फक्त सर्वसाधरण कर रद्द केला.मात्र,महापालिकेने 2017 मध्ये केलेल्या ठरावा नुसार संपुर्ण कर रद्द झाला पाहिजे.त्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणीही त्यांनी केली.

‘माझी मुंबई, माझी कॉंग्रेस'! BMC निवडणूकीसाठी कॉंग्रेसचा कृती आराखडा तयार

2012 पर्यंत दर दहा वर्षांनी नगरसेवकांच्या प्रभागाचे आरक्षण बदलले जात होते.मात्र,त्यानंतर दर पाच वर्षांनी आरक्षण बदलले जाऊ लागले.याचा फटका प्रभागाच्या विकासकांना बसत आहे.त्यामुळे फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपासून जुन्या नियमांची अमंलबजावणी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

 

‘महाविकास आघाडी निवडणुकीनंतर किमान समान कार्यक्रमावर आधारीत आहे.या आघाडी सरकार मध्ये राहून प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे.त्यामुळे कॉंग्रेस वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत’-

भाई जगताप,
आमदार अध्यक्ष मुंबई कॉंग्रेस

Congress will contest BMC elections on the issue of free water

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will contest BMC elections on the issue of free water