राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार डहाणू दौऱ्यावर; दिवंगत नेत्यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

नारायण पाटील
Sunday, 11 October 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरद पवार आज डहाणूच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी नुकतेच निधन झालेले राष्ट्रवादीचे डहाणू विधानसभा अध्यक्ष राजेश हसमुखलाल पारेख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

डहाणू  ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरद पवार आज डहाणूच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी नुकतेच निधन झालेले राष्ट्रवादीचे डहाणू विधानसभा अध्यक्ष राजेश हसमुखलाल पारेख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याच वेळी डहाणू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी यांचेही निधन झाल्याने त्यांचा मुलगा नगरसेवक तन्मय बारी यांनाही आस्थेने जवळ बोलावून धीर दिला. 

धनगर समाजाच्या आरक्षण व आर्थिक विकासाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

पवार यांनी डहाणू गावात जाऊन निधन झालेल्या रमेश भाई कर्नावट यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आस्थेने त्यांची विचारपूस केली; तर वाणगाव येथील निधन झालेले राष्ट्रवादीचे मुकुंदराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सुनील भुसारा, मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार कॉ. विनोद निकोले, लक्षदीपचे खासदार सादिक मोहम्मद, नगराध्यक्ष भरत राजपूत, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, सत्यम ठाकूर, सुहास संखे आदी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा किंवा दांडियाची शक्यता धूसर, गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठीही नियमावली

दरम्यान, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने रद्द केलेले आणि मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर आणि समृद्ध परिसराला उद्‌ध्वस्त करणारे वाढवण बंदर केंद्र सरकार कायदे धाब्यावर बसवून जेएनपीटीच्या माध्यमातून उभारू पाहत आहे. त्याला आळा घालण्यास राज्य सरकारला निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने शरद पवार यांना दिले. 

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation to Parekh family from  NCP leader Sharad Pawar in dahanu