लॉकडाऊन दरम्यान रेल्वेची चमकदार कामगिरी, तब्बल 19 नवीन FOBची उभारणी

प्रशांत कांबळे
Thursday, 5 November 2020

मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडून मुंबई विभागात लॉकडाऊन काळातील सात महिन्यात एकूण 19 नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) उभारण्यात आले आहे. 14 एफओबी पश्चिम रेल्वे आणि इतर मध्य रेल्वे मार्गावर पुलांचा समावेश आहे.

मुंबई:  मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडून मुंबई विभागात लॉकडाऊन काळातील सात महिन्यात एकूण 19 नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) उभारण्यात आले आहे. 14 एफओबी पश्चिम रेल्वे आणि इतर मध्य रेल्वे मार्गावर पुलांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती. त्याचा फायदा घेत रेल्वे प्रशासनाने, रेल्वे मार्गावरील देखभाल दुरूस्ती आणि विकासाची कामे पूर्ण केली आहे.

रेल्वे मार्गावर एफओबीच्या दुर्घटना झाल्यानंतर आयआयटी बॉम्बेच्या अहवालानुसार वर्ष 2019 मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर 50 तर मध्य रेल्वे मार्गावर 30 एफओबी धोकादायक स्थितीत असल्याचा ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आला होता. यापैकी काही एफओबीची दुरूस्ती तर काहींना पाडून नव्याने उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते. 

अधिक वाचाः  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्देश; संगनमताने होणारी वीज बिलातील लूट थांबवा

दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर लॉकडाऊन काळात काम पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात तीन एफओबी प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये विक्रोळी, ठाकुर्ली आणि डोंबिवलीचा समावेश आहे. आयआयटी बॉम्बेने पश्चिम रेल्वे मार्गावरील 16 एफओबी पाडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यापैकी 13 एफओबी पाडण्यात आले आहे. दादर, अंधेरी, गोरेगांव या पुलांना पाडण्याचे काम सुरू असून 31 डिसेंबर पर्यंत पाडण्यात येणार आहे.

अधिक वाचाः  हॉटेल्सचा मालमत्ता कर माफ, विरोध करुन शिवसेनेने प्रस्ताव मंजूर केला

------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Construction of 19 new FOBs on Central Western Railway


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of 19 new FOBs on Central Western Railway