कुलाबा फॅशन मार्केटला ग्राहकांची आस; लोकल बंद असल्याचाही फटका

कुलाबा फॅशन मार्केटला ग्राहकांची आस; लोकल बंद असल्याचाही फटका


मुंबादेवी : अनलॉकच्या टप्प्यांत विविध मुंबईत विविध व्यवसाय खुले होत असले तरी मुंबईच्या दक्षिण टोकावर वसलेल्या कुलाबा कॉजवे फॅशन मार्केट स्ट्रीटला आता गतवैभव परत येण्याची आस लागलेली आहे. येथील जवळपास 190 स्टॉल्स ग्राहकांविना ओस पडले आहेत. कोव्हिडमुळे परदेशी पर्यटकांचा आटलेला ओघ आणि सामान्यांसाठी बंद असलेली लोकल यामुळे सध्या केवळ 10 ते 15 टक्के व्यवसाय होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. 

कॅफे मोंडेगरपासून सुरू झालेले हे मार्केट थेट भीडभंजन महादेव मंदिरापर्यंत पसरले आहे. एका बाजूला ब्रॅंडेड शॉप्स आणि दुसऱ्या बाजूला पालिकेचे लायसन्स स्टॉल्स, असे या मार्केटचे स्वरूप आहे. सध्या ग्राहकांची वर्दळ नसल्याने स्टॉलमालक व नोकर रस्त्यावरील लोकांना वस्तू खरेदीस विनंती करताना दिसत आहेत. येथे माणिक, मोतींपासून जीन्स, कुर्ते, मेकअप साहित्य, ब्रिटिशकालीन जहाजातील दिशादर्शक होकायंत्रे, धातूच्या देवी-देवता व बुद्धाच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. खरेदीसाठी ग्राहकच नसल्याने विक्रेत्यांना कमी किमतीत वस्तू विकाव्या लागत आहेत. अगदी कॅफे मॉंडेगर, लिओपोर्ड कॅफे या प्रसिद्ध रेस्टारंटमध्येही ग्राहकांची नेहमीची लगबग थंडावली आहे. आता सामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यावरच ग्राहकांची वर्दळ वाढेल, अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करीत आहेत. 

अजूनही कोरोनाची धास्ती 
कुलाबा फॅशन मार्केट परदेशी ग्राहकांनी नेहमी गजबजलेले असायचे. आता विमानसेवा बंद असल्याने परदेशी पाहुणे येत नाहीत. कोरोनाच्या धास्तीने व लोकल सेवा बंद असल्याने स्थानिक ग्राहकांचाही प्रतिसाद नाही. त्यामुळे आता 15 टक्‍क्‍यांच्यावर व्यवसाय होत नसल्याचे कुलाबा कॉजवे हॉकर्स वेल्फेयर असोसिएशनचे अध्यक्ष सरदार अहमद शेख यांनी सांगितले. 

Consumer absent Colaba fashion market in Mumbai

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com