

Electricity Leakage Crisis Deepens in Maharashtra, Consumers Bear the Cost
sakal
-बापू सुळे
मुंबई : राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणकडून दरवर्षी सुमारे १,५०० ते १,७०० कोटींहून (सुमारे एक लाख ७० हजार दशलक्ष) अधिक युनिट विजेचे वितरण केले जाते. त्यापैकी वीज आयोगाकडून ११ ते १२ टक्के वीजगळती मंजूर असताना, प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच जवळपास २५० कोटी (२५ हजार दशलक्ष) युनिट विजेची गळती होत आहे. चोरी आणि तांत्रिक कारणांमुळे वीजगळती होत असून, त्याची किंमत तब्बल ७०० ते ८०० कोटींपर्यंत असून, त्याचा थेट भुर्दंड वीजदरवाढीतून ग्राहकांना पडत आहे.