डोंबिवली : खडेगोळवलीत दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात | Contaminated water | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

contaminated water

डोंबिवली : खडेगोळवलीत दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - खडेगोळवलीमधील (Khade Golavali) रामा कृष्णा कॉलनी, पार्वती नगर, श्री मलंग कॉलनी परिसरात दूषित पाणी पिल्याने (Contaminated water) नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास (people health issue) होऊ लागला आहे. नागरिकांनी जवळील क्लिनिक, आरोग्य केंद्रात (health center) जाऊन उपचार घेतले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परिसरातील 40 ते 50 नागरिकांना दूषित पाण्याची बाधा झाल्याने पालिका प्रशासनाने (kdmc) परिसराची पाहणी केली. येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी (water sample checking) पाठविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: हॉटेलच्या खोलीत कोल्हापुरच्या बिझनेसमॅनला असं अडकवलं हनीट्रॅपमध्ये

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. हे पाणी पिल्याने श्री मलंग कॉलनी, रामा कृष्णा कॉलनी, पार्वती नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह 40 ते 50 नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. नागरिकांनी जवळच्या क्लिनिक मध्ये उपचारासाठी धाव घेतली. क्लिनिक मध्ये येणाऱ्या नागरिकांना सारखाच त्रास होत असल्याने दूषित पाण्यामुळे हा त्रास झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे नागरिक मोजेश दोडमणी या रहिवाशाने सांगितले.

नागरिकांनी विभाग प्रमुख जगदीश तरे यांच्याकडे धाव घेत याविषयी माहिती दिली. त्यांनी देखील पाहणी केली असता क्लिनिक, खडेगोळवली येथील आरोग्य केंद्रात उपचार घेतले आहेत. दूषित पाणी पिल्याने उलट्या, जुलाब होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी उप अभियंता सी.टी. सोनावणे यांच्याकडे आम्ही शुक्रवारी तक्रार केली. त्यानुसार शनिवारी पाणी पुरवठा विभागाचे श्याम रसाळ यांच्या टीमने सर्व चाळ परिसराची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बाळकृष्ण तरे हे देखील उपस्थित होते. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच सोमवारी पाण्याच्या जलवाहिनी ची तपासणी करून दूषित पाणी कुठे मिसळत आहे याचा आढावा घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे विभाग प्रमुख जगदीश तरे यांनी सांगितले.

loading image
go to top