अंधेरी: हॉटेलच्या खोलीत असं अडकवलं कोल्हापुरच्या बिझनेसमॅनला हनीट्रॅपमध्ये | Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sex racket.jpg

हॉटेलच्या खोलीत कोल्हापुरच्या बिझनेसमॅनला असं अडकवलं हनीट्रॅपमध्ये

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोल्हापूरमधल्या एका उद्योजकाला (Kolhapur businessman)ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून ३.३ कोटी रुपये उकळल्याप्रकरणात गुरुवारी तीन जणांना अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिला आहेत. अटकेत असलेल्या दोघींपैकी एका महिलेचा ६४ वर्षीय उद्योजकाला हनीट्रॅपच्या (Honey trap) जाळ्यात अडकवण्यासाठी वापर करण्यात आला. उद्योजकाने रक्कम अदा केल्यानंतरही त्याला सातत्याने अटकेची भीती दाखवून धमकावण्यात येत होते.

४२ वर्षीय मोनिका भगवान उर्फ देव चौधरीने स्वत:ला पीडित म्हणून दाखवलं होतं. पोलीस तिच्या शोधात आहेत. मोनिकाचे साथीदार फॅशन डिझायनर ल्युबना वझीर उर्फ सपना (४७), अनिल चौधरी उर्फ आकाश (४२) आणि ज्वेलर्स मनिष सोढी (४१) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मोनिकाला खंडणी उकळण्यात आणि ब्लॅकमेलिंगमध्ये मदत केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: नवविवाहित काकी पुतण्यासोबत पळाली, काकाची पोलीस ठाण्यात धाव

२०१९ मध्ये कोल्हापुरातील हा उद्योजक मुंबईत अंधेरी येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला होता. त्यावेळी सपना, अनिल आणि मोनिकाने या उद्योजकाची त्याच्या रुमममध्ये जाऊन भेट घेतली होती व त्याच्याशी मैत्री केली होती. सपना आणि अनिल घाईघाईत हॉटेलमधून बाहेर पडले. मोनिका बिझनेसमॅनसोबत रुममध्येच थांबली होती, असं पोलिसांनी सांगितलं. सपना आणि अनिलने तिथून निघून जाणं, हा त्यांच्या कटाचाचा एक भाग होता.

हेही वाचा: 'नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे...', वरुण गांधींचं मोदींना पत्र

काहीवेळाने सपना आणि अनिल पुन्हा रुममध्ये आले. त्यावेळी मोनिका अचानक बेडवर जाऊन झोपली. प्लाननुसार सपनाने शूटिंग सुरु केलं. बिझनेसमॅन त्यावेळी मोनिकाच्या जवळच होता. मोनिकावर बिझनेसमॅनने लैंगिक जबरदस्ती केल्याचा आरोप सपनाने केला. आपण निर्दोष आहोत, आपली काही चूक नाही असे तो बिझनेसमॅन सांगत होता. पण तिघांना त्याला पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली व त्याच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसाने सांगितले.

त्यानंतर एकप्रकारचे धमक्यांचे सत्र सुरु झाले. या काळात उद्योजकाने ३.२५ कोटी रुपये त्यांना दिले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तिन्ही आरोपींनी अलीकडेच पाच कोटी रुपयांची मागणी केली व पैसे दिले नाहीत, तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे बिझनेसमॅनचे लक्ष विचिलत झालं होतं. ही गोष्ट त्यांच्या मुलाच्या लक्षात आली. त्याने विचारणा केल्यानंतर वडिलांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. मुलाने अखेर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी आरोपींकडून २९ लाख रुपये, सात फोन, नऊ लाखाचं सोन आणि दोन गाड्या जप्त केल्या आहेत. बिझनेसमॅनकडून १७ लाख रुपये घेताना तिघांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top