JNPT मध्ये सतत वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र सुरू

सुभाष कडू
Sunday, 10 January 2021

भारताचे  प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने 'सतत वातावरणीय वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्र' (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे.

मुंबईः  भारताचे  प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने 'सतत वातावरणीय वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्र' (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. पर्यावरणासंबंधी आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आणि हरित बंदर बनविण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे सदर केंद्र सूरु केले आहे. या केंद्राचे उद्घाटन जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी,यांनी  केले. याप्रसंगी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, सीव्हीओ ए.एस. रामटेके, आयआयटी मद्रासचे प्रोफेसर प्रा.शिवा नागेंद्र आणि जेएनपीटीचे विभागाध्यक्ष उपस्थित होते.

बंदरातील वास्तवीक वायु गुणवत्तेची स्थिती जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या या ‘सतत वातावरणीय वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्राचे’ संचालन आणि देखभाल  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास द्वारे केले जाईल. जेएनपीटीमध्ये राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानकानुसार हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जात आहे. बंदरातील अनेक ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेची स्वयंचालित माहिती उपलब्ध होण्यासाठी सेंसर-आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण उपकरणे बसविण्यात आली आहेत. या नवीन प्रणालीमुळे जेएनपीटीस सस्टेनेबल ग्लोबल बंदरांच्या समतुल्य बनण्यास आणि जगातील अग्रगण्य कंटेनर बंदरांमध्ये वरच्या स्थानावर पोहचण्यास मदत होईल.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नुकत्याच सुरू झालेल्या या केंद्रामध्ये पार्टिक्युलेट मॅटर 10, आणि 2.5, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, अमोनिया, ओझोन, कार्बन, कार्बन मोनोऑक्साइड, नाइट्रोजन डाइऑक्साइड, आणि वोलटाइल ओरगॅनिक कंपाउण्ड्स सारख्या वास्तविक वायू गूणवत्ता पॅरामीटर्सचे निरीक्षण केले जाईल.

याशिवाय तापमान, पाऊस, हवेतील आर्द्रता, सौर किरणे, वाऱ्याचा वेग आणि दिशा यासारख्या हवामानाशी निगडित 6 पॅरामीटर्सचे देखील या केंद्रामध्ये निरीक्षण केले जाईल.
 
केंद्रात एकत्रित केलेली  वास्तविक सतत वायू गूणवत्ता माहितीचे प्रदर्शन

या केंद्रामध्ये वास्तवीक सतत वायु गुणवत्ता माहिती देखील एकत्रित केली जाईल, जी मोठ्या स्क्रीनद्वारे लोकांना दाखविण्यात येईल तसेच सामान्य लोकांना ही माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ही माहिती जेएनपीटीच्या वेबसाइटवर देखील प्रदर्शित केली जाईल.

हेही वाचा- ठाण्यातल्या वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव, आगीत दोन जवानांसह 7 जण जखमी

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Continuous atmospheric air quality monitoring CAAQMS center started in JNPT


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continuous atmospheric air quality monitoring CAAQMS center started in JNPT