esakal | ठाण्यातल्या वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव, आगीत दोन जवानांसह 7 जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातल्या वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव, आगीत दोन जवानांसह 7 जण जखमी

ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये लागलेल्या आगीत दोन जवानांसह ७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यातल्या वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव, आगीत दोन जवानांसह 7 जण जखमी

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

मुंबई:  ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये लागलेल्या आगीत दोन जवानांसह ७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वागळे इस्टेट रोड नंबर 28 येथील एका दुकानाला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियत्रंण मिळावत असताना सिलेंडरच्या झालेल्या भडक्यात दोन जवानांसह एक क्यूआरव्ही चालक आणि अन्य चार स्थानिक नागरिक यात जखमी सात जण जखमी झाले आहे. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी ही माहिती दिली आहे. 

शरद कदम (56) आणि दीपेश पेटकर (26) अशी जखमी जवानांची नावे आहे. तर क्यूआरव्ही चालक प्रसाद सुतार (25) याच्यासह नितीन कदम (20), केशव सकपाळ (55), रोहन पांढरे (21) आणि मंगेश कदम (40) हे स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ठाण्यातील वागळे इस्टेट रोड नं. 28 येथील रामनगर परिसरातील एका गाड्यांच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीचे लोंढे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या दुकानाच्या शेजारील तळ अधिक एक माळ्याचे घर क्रमांक 1 आणि 2 अशा दोन्ही घरांना या आगीची झळ पोहोचली. यामध्ये मर्द मराठा दुकानासह घर क्र. 2 यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

आगीवर नियंत्रण मिळवत असताना अग्निशमनचे जवान कदम यांच्या हाताला तर दीपेश यांच्या डोक्याला तर प्रसाद याच्या पायाला तसेच नितीन यांच्या हाताला, केशव याच्या डोक्याला, तसेच रोहन याच्या हाताला, मंगेश याच्या नाकाला दुखापत झाली आहे.

हेही वाचा- मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा म्हणत शिवसेनेचा आज गुजराती मेळावा

जखमी झालेल्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. सिलेंडरच्या भडक्यात हे सर्व जण जखमी झाले असून ते किरकोळ जखमी असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलिस, अग्निशमन दल, एमएससीबी, ठामपा आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane gas cylinder explosion Seven injured two firefighters Wagle Estate