गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने लोकलफेऱ्या वाढवल्या, 355 ऐवजी आता मरेच्या 423 फेऱ्या

प्रशांत कांबळे
Thursday, 24 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये अनेक विभागातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असलेल्या लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोविड 19 च्या नियमांचा भंग होऊन, प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 355 फेऱ्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर धावत होत्या, त्यामध्ये आता 68 फेऱ्यांची वाढ झाली असून, आता 423 फेऱ्या मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे.

नुकतेच  1 सप्टेंबरपासून खासगी कार्यालय कर्मचार्‍यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरुन 30 टक्के झाली, तर सरकारी कर्मचार्‍यांचीही उपस्थिती 20 टक्यांवरुन 30 टक्के करण्यात आली. तसेच  राज्य सरकारच्या विनंतीवरून सर्व सहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना लोकल सेवेत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल आणि बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणात ताण आला असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा ही भंग होतांना दिसून येत आहे.

महत्त्वाची बातमी : डबेवाल्यांना चिमटा काढून राज ठाकरे म्हणालेत, मी सरकारशी बोलतो...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये अनेक विभागातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता, मध्य रेल्वेने कोरोनाच्या संसर्ग पसरु नयेत, तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर नियम पाळण्यासाठी तब्बल 68 लोकल फेर्‍या वाढविण्यात आल्या आहे. आता मध्य रेल्वे मार्गावर दिवसाला एकूण 423 लोकल फेर्‍य धावणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 
अशा धावतील अतिरिक्त 68 लोकल फेर्‍या 

 • कसारा - सीएसएमटी  9 फेर्‍या 
 • कसारा - कल्याण-सीएसएमटी  6  फेर्‍या
 • कर्जत - सीएसएमटी 9 फेर्‍या
 • ठाणे - कर्जत-सीएसएमटी 2 फेर्‍या 
 • कल्याण - कर्जत-सीएसएमटी 2 फेर्‍या 
 • अंबरनाथ - सीएसएमटी 3 फेर्‍या  
 • कल्याण - सीएसएमटी 5 लोकल फेर्‍या
 • ठाणे - सीएसएमटी 4 फेर्‍या 
 • कुर्ला - सीएसएमटी 6 फेर्‍या 
 • पनवेल - सीएसएमटी 14 फेर्‍या 
 • वाशी - सीएसएमटी 8 फेर्‍या

to control crowd in mumbai local central railways increased frequency of trains


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to control crowd in mumbai local central railways increased frequency of trains