esakal | लोकल स्टेशन्सवर गर्दी होऊ नये म्हणून सरकारचा मास्टरप्लॅन, कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर ई-पास व्यवस्थेवर अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

लोकल स्टेशन्सवर गर्दी होऊ नये म्हणून सरकारचा मास्टरप्लॅन, कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर ई-पास व्यवस्थेवर अभ्यास

ई पास पध्दतीमुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेला मदत होणार आहे.

लोकल स्टेशन्सवर गर्दी होऊ नये म्हणून सरकारचा मास्टरप्लॅन, कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर ई-पास व्यवस्थेवर अभ्यास

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : सरसकट प्रवासाला मंजूरी दिल्यास स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर ई पास व्यवस्था विकसीत करण्याच्या विचार राज्य सरकारचा आहे. शुक्रवारी या संदर्भात आभासी बैठका पार पडल्या. यापुर्वीही रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोलकात्ता मेट्रोच्या तिकीट नियोजनावर चर्चा झाली होती. 

कोलकात्ता मेट्रोप्रमाणे रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांना प्रवेश देण्यासाठी ई पास पध्दतीचा अंवलंब करण्याचा प्रयत्न रेल्वे आणि राज्य सरकारचा आहे. ही यंत्रणा नेमकी काय आहे याचे सादरीकरण राज्य आणि रेल्वे अधिकाऱ्यापुढे करण्यात आले. ही प्रणाली विकसित करणाऱ्या कंपनीने रेल्वे अधिकाऱ्यांना स्टेशन, प्रवासाचा वेळ, बसण्याची क्षमता या संदर्भातील तपशील रेल्वेला विचारला. रेल्वे लवकरचं ही संपुर्ण माहिती या कंपनीला देणार आहे. त्यानंतर या संदर्भात अजून बैठका होणार आहे. 

महत्त्वाची बातमी : स्तनांमधील सर्व गाठी म्हणजे कर्करोग नव्हे! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

ई पास पध्दतीमुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेला मदत होणार आहे. कोविड नियमावलीमुळे एकाच वेळी लाखो प्रवाशाना प्रवास करु देणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे गर्दीचे नियोजन करणे हे मोठे आव्हान रेल्वेपुढे आहे.  या प्रणाली अंतर्गत प्रवाशांना त्यांच्या मोबईल ऍप डाऊनलोड करावे लागणार असून,या माध्यमातून प्रवासाच्या सहा तासापुर्वी ई पासेस बुक करावे लागणार आहे. ई पासमुळे त्या वेळेला स्टेशनमध्ये प्रवेश करायची परवानगी मिळणार आहे. प्रवाशांना प्रवासासाठी तिकीट काढावे लागणार आहे. कोलकात्ता मेट्रोमध्ये दर तासाला स्टेशनमधील प्रवेशाचा वेळा निश्चित केल्या आहेत. मात्र त्या बदलता येतात. कोलकात्ता मेट्रोमध्ये एक दिवसापुर्वी प्रवाशांना ई पास काढता येतो. मात्र मुंबईमध्ये हा वेळ 48 तासापर्यंत करण्याचा विचार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

to control crowd on mumbai local platform government is working on giving e pass

loading image
go to top