Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकाराला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

Who is Ketan Tirodkar : मुंबई गुन्हे शाखेने तिरोडकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Controversial statement against Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis
Controversial statement against Maharashtra Deputy CM Devendra Fadnavisesakal

Who is Ketan Tirodkar :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका माजी पत्रकाराला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिली. तसेच त्यांची बदनामी केली. देवेंद्र फडणवीस ड्रग माफियांना मदत करतात आणि ते ड्रग माफियांवर कठोर कारवाई करत नाहीत, असा आरोप देखील केतन तिरोडकर यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई गुन्हे शाखेने केतन तिरोडकर याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Controversial statement against Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis
Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर...काही जण अडकल्याची भिती

सोमवारी, क्राईम इंटेलिजन्स युनिटने तिरोडकर यांच्याविरोधात विरोधात प्रॉडक्शन वॉरंट काढले आणि न्यायालयाच्या परवानगीने त्याला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेने तिरोडकरला संबंधित आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वी सायबर पोलिसांनी तिरोडकरला उत्तराखंडमधून महिलेच्या अपमानजनक विनयशीलतेच्या 354 आयपीसीच्या प्रलंबित खटल्याप्रकरणी अटक केली होती.

Controversial statement against Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis
Accident News: हैदराबादला जाणाऱ्या बसला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू, बस जळून खाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com