शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून कल्याण शिवसेनामध्ये मतभेद

रविंद्र खरात 
सोमवार, 21 जानेवारी 2019

कल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी कल्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचा गौरव  कार्यक्रम आहे. याबाबत कल्याण शिवसेनेच्या वतीने शिवसेना कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, रवि पाटील, रवि कपोते, अरविंद मोरे आदींनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

कल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी कल्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचा गौरव  कार्यक्रम आहे. याबाबत कल्याण शिवसेनेच्या वतीने शिवसेना कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, रवि पाटील, रवि कपोते, अरविंद मोरे आदींनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. याला काही तास होत नाही तोच आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला निघणारी मिरवणूक रद्द करण्याच्या निर्णयाचा मी जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया शिवसेना कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी फेसबुकवर टाकल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमावरून कल्याणच्या शिवसेना मधील वादंग चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बुधवार ता 23 जानेवारी रोजी राज्यभर जयंती साजरी करण्यात येत असून, कल्याणमध्ये ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याबाबत माहिती देण्यासाठी आज सोमवार 21 जानेवारी 
कल्याण टिळक चौकात शिवसेना शाखेत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अरविंद मोरे, रवि कपोते, रवि पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी शहर प्रमुख विश्वनाथ भोईर म्हणाले, कल्याणमधील भगवा तलाव येथील शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासमोर एक दिवसाचे व्यंग चित्र प्रदर्शन होणार असून, त्याचे उदघाटन सकाळी 10 वाजता महापौर विनिता राणे यांच्या हस्ते होणार आहे. विविध व्यंगचित्रकारांनी साकारलेली शिवसेना प्रमुखावरील व्यंग चित्रे पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे. शिवसेना प्रमुख यांच्या प्रमाणेच भाषा प्रभू राम गणेश गडकरी, सुभाषचंद्र बोस, प्रमोद नवलकर या त्रिमूर्तीनांही अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. 

याला काही तास होत नाही तोच शिवसेना कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांनी फेसबुक वर आपला निषेध व्यक्त केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला भव्य मिरवणूक त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी काढली जाते, त्याच प्रमाणे शिवसैनिकाना कसे धाडसाने जगायचे हे ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी शिकविले त्यांची पण भव्य मिरवणूक कल्याणमध्ये 2013 पासून काढण्यात येत होती. मात्र यावर्षी शिवसेनेच्या काही चार पाच नेत्यांनी मिरवणूक काढायची नाही असा निर्णय घेतला. त्याचा निषेध शिवसेना कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी केल्याने कल्याण शिवसेने मधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम अभिवादंग चर्चेचा विषय ठरला आहे. 

घरातील कार्यक्रम असल्याने बैठकीला गेलो नाही मात्र माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ही पदाधिकारी याना सांगितले होते की मिरवणूक रद्द करू नका , मी निरोप ही दिला होता वरिष्ठ नेते आणि शिवसैनिक यांना विश्ववासात न घेता हा कार्यक्रम ठरविल्याने मी निषेध केला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांनी दिली .

सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी , वरिष्ठ नेते यांना सांगूनच हा कार्यक्रम आयोजित केला असून त्या बैठकिला महानगर प्रमुख गैरहजर होते त्यामुळे हे आरोप खोडसाळ असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversy in Shiv Sena from balasaheb Thackeray Jayanti program