
मुंबई : महापालिकेच्या कुपर रुग्णालयात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे. तर, येथील स्वच्छतागृहातून दुर्गंधी पसरत असल्याने रुग्ण व नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान तसेच स्वच्छतेसाठी विविध अभियान सरकारकडून राबवण्यात येत असली तरी महापालिकेतील रुग्णालये मात्र अजूनही स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावी तशी जागरूक झालेली दिसत नाहीत.