मुख्यमंत्री कार्यालय, वर्षा निवासस्थानी पुन्हा कोरोनाचा शिरकाव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

CMO आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : मुख्यमंत्र्यांचं 'वर्षा' निवासस्थान आणि मुख्यमंत्री कार्यालयात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळं खळबळ उडाली असून इथं काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कोविडच्या चाचण्या करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही काळजी घेण्यात येत असून ही दोन्ही ठिकाणं सॅनिटाईज करण्यात आली आहेत.

हेही वाचा: 'आदिपुरुष'मध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधिर नाईक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ट हाॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तात्काळ तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: VIDEO: "स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?"

दरम्यान, स्पॉंडिलायसिसच्या दुखण्यामुळं त्रस्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गिरगाव येथील एचएम रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना अद्याप डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.

loading image
go to top