VIDEO: "स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: "स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?"

VIDEO: "स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?"

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे: 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने केल्यानंतर देशात मोठा गदारोळ सुरु झाला. तिच्या या वक्तव्याचा पुनरुच्चार अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील केला. भाजपला हिंदूत्व या फॅसिस्ट राजकीय विचारधारेवर आधारित देश निर्माण करायचा आहे. राजकीय आश्रय असलेली ही मंडळी म्हणूनच अशी विधाने करत असल्याचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. मिळालेलं स्वातंत्र्य जर 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणायचं का? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केला आहे. पुण्यात संविधानिक राष्ट्रवाद मंचाच्या उद्घाटनानंतर 'सकाळ'शी बोलताना त्यांनी ही विधाने केली.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

अशा विधानांमागे राजकारण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय की, ही विधानं निरर्थक असली तरीही यामागे एक राजकारण दडलेलं आहे. अशी विधाने करणाऱ्यांना राजाश्रय आहे. याशिवाय, त्यांना अशी विधाने करणं शक्य झालं नसतं. हे फॅसिस्ट राजवट आणण्याचे नियोजन आहे. अशा विधानांना आणि प्रवृत्तींना सभ्यतेचं रुप द्यायचा प्रयत्न सुरु आहे. याचा निषेध तर आहेच, मात्र नागरिकांनी याचं खरं स्वरुप ओळखून पर्यायी चळवळीच्या मागे गेलं पाहिजे.

तर मग सावरकर 'भिक्षावीर'

निरंजन टकले यांनी म्हटलंय की, हा आयडिया ऑफ इंडिया बदलण्याचा प्रकार आहे. तसेच हा न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये या विचारसरणीच्या लोकांचं काहीही योगदान नाही. आणि काहीही योगदान नाही, हा जो न्यूनगंड आहे, तो झाकण्यासाठी म्हणून अशी उर्मट विधाने केली जात आहेत. हा एक प्रकारचा मानसिक आजार देखील आहे. सावरकरांना विक्रम गोखले तरी स्वातंत्र्यवीर म्हणतात ना तर मग उद्यापासून विक्रम गोखले सावरकरांना भिक्षावीर म्हणणार आहेत का? जे स्वातंत्र्य मिळालं ते जर भीक असेल तर सावरकरांना भिक्षावीर म्हणा, असं त्यांनी म्हटलंय. ही फॅसिजमची थेअरी आहे की, अशा प्रकारच्या त्यागाला आणि प्रेरणेलाच हास्यास्पद ठरवायचं आणि असं हास्यास्पद ठरणंच 'नेहमीचं' आणि 'सभ्य' बनवायचं. गेली सात वर्षे सुरु असणाऱ्या या प्रकाराची आता परिसीमाच गाठण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

न्यूनगंडातून आलेली वक्तव्ये

अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचे प्रयत्न व्हावेत हे काँग्रेसला उशीरा सुचलेलं शहाणपण नाही का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शहाणपणाचा प्रश्न नाही, मात्र आपला देश ज्या उदार आणि लोकशाही मूल्यावर उभा करण्यात आला तेंव्हा अशा प्रकारचा धोका उद्भवेल, याची कल्पना नसेल. मात्र, या प्रचाराला आता उत्तर दिलं पाहिजे. कुणी कमी पडलं असं नाहीये. मात्र आता 2024 चं टाईमटेबल डोळ्यासमोर ठेवून हे केलं जातंय आणि हा न्यूनगंड आहे याच्याशी मी सहमत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

हिंदू आणि हिंदूत्वामध्ये फरक

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज देशामध्ये हिंदू धर्म, हिंदूइझम आणि हिंदूत्वाची योग्य व्याख्या करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदू धर्म प्रत्येकाची खाजगी बाब असू शकतं. मात्र सरकार एका धर्माचं असून शकत नाही. हिंदूत्व ही राजकीय हुकूमशाही विचारधारा आहे. याचीच व्याख्या सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातून करण्याच प्रयत्न झाला. हिंदूत्व आणि हिंदू धर्म वेगळा असल्याचंच राहूल गांधी यांनीही सांगितलं आहे. संविधानावर आधारित नव्हे तर अशा हुकूमशाही हिंदूत्वातूनच राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

loading image
go to top