esakal | कल्याण मध्ये बारवर छापा, 56 जणांना घेतले ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Monalisa Bar

कल्याण मध्ये बारवर छापा, 56 जणांना घेतले ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कोरोना (corona) निर्बंध शिथिल होताच बारचालकांनी (Bar Owners) छम छम ला सुरवात केली आहे. कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील (hajimalang road) मोनालीसा बारवर (monalisa Bar) कल्याण गुन्हे शाखेने (Kalyan crime branch) शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास छापा टाकला. यात 21 महिला, 30 ग्राहक व बारचालकासह वेटर मिळून 5 असे एकूण 56 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 78 हजार किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: प्रमुख रुग्णालयांवरील कोविडचा भार कमी करणार; मुंबईत मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण वाढ

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला मोनालीसा बार मालक व चालक हे बिना नोकरनामा व परवाना बार चालवित आहेत. शिवाय बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिलांची सर्व्हिस दिली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत कल्याण गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री बारवर छापा टाकत कारवाई केली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 56 जणांवर कारवाई करीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. मालशेटे यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top