मुंबईतील उद्याने झाली खुली ; महापालिका निर्णयाची अमंलबजावणी

bmc garden
bmc gardensakal media
Updated on

मुंबई : कोविड परिस्थिती पूर्णपणे (corona situation) नियंत्रणात आल्यानंतर आता महानगरपालिकेने (bmc) जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी (unlock) पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. मुंबईतील चौपाट्या, समुद्र किनाऱ्यांसह उद्यान मैदाने (garden) सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. स्वातंत्रदिनी संध्याकाळी उशीरा महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी हा निर्णय घेतला असून त्याची अमंलबजावणी सोमवार (monday) पासून सुरु झाली आहे.

कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पाऊस मुंबईतील चौपाट्यांवरील वावरावर निर्बंध आण्यात आले होते.वर्षभराहून अधिक काळानंतर चौपाट्या नागरीकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.तर,उद्याने मैदाने यापुर्वी ठराविका वेळेसाठी नागरीकांना खुले करुन देण्यात आले होते.मात्र,आज पासून सकाळी 6 ते रात्री 10 वाजे पर्यंत मैदाने,उद्याने,चौपाट्या,समुद्रकिनारे नागरीकांना खुले राहाणार आहेत. मुंबईत 860 उद्याने, 318 मैदाने असून सात चौपाट्या आहेत.

bmc garden
औरंगाबाद MIDC मध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प; तिसऱ्या लाटेसंदर्भात सावधगिरी

नागरीकांच्या सहकार्यामुळे कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही नियंत्रण मिळवण्यात आले आहे.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र,सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता मास्क वापरणे,सुरक्षीत अंतर राखणे,हातांची स्वच्छता राखणे ही त्रिसुत्री नागरीकांनी पाळावी असे आवाहन आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. कोविड प्रतिबंधक निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

...तर कारवाई

निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.मात्र,नागरीकांनी कोविड काळातील त्रिसुत्री पाळण्या बरोबरच इतर आवश्‍यक नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.अन्यथा साथ नियंत्रण कायदा 1897,आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिला आहे.यात रोख दंड तसेच तुरुंगावाची शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com