म्यूकरमायकोसिसनंतर बेल पक्षाघाताचा वाढता धोका; दुसऱ्या लाटेत रुग्णांची भर

bells palsy decease
bells palsy deceasesakal media

मुंबई : कोरोनामधून (corona) बरे झाल्यानंतरही रुग्ण (corona patient) अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाही. म्यूकरमायकोसिसनंतर (mucormycosis) बेल पक्षाघात (चेहऱ्याचा पक्षाघात) होण्याचा धोका वाढला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत (corona second wave) जास्त रुग्ण आढळून येत असल्याचे डाॅक्टरांचे निरीक्षण आहे. कोरोनापूर्वी, थंडीच्या हवामानात अशी प्रकरणे आढळली होती, परंतु कोरोनामुळे ही संख्या आता आणखी वाढली आहे. पहिल्या लाटेत वेगवेगळ्या रुग्णालयांचे डॉक्टर (doctors) एका महिन्यात एक ते दोन केसेस बघत होते, पण आता न्यूरोलॉजिस्ट आठवड्यातून दोन ते तीन रुग्ण बघत आहेत.

bells palsy decease
एसटीच्या मुंबई विभागातच व्हिटीएस यंत्रणा कुचकामी; प्रवाशांच्या तक्रारी

मुंबईत राहणारे 55 वर्षीय सुजीत मिश्रा (नाव बदलले आहे) यांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती आणि ते उपचाराने बरेही झाले होते. एवढेच नाही तर कोरोनातुन सुरक्षा मिळावी म्हणून 31 जुलै रोजी कोरोना लसीचा पहिला डोस देखील घेतला. लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीचा चेहरा कुटुंबाला अर्धांगवायू झाल्याचा आढळला. कुटुंबातील सदस्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांनी सांगितले की, या रुग्णाला पाणी पिण्यास आणि खाण्यास समस्या उद्भवली होती. गुळण्या करताना तोंडातून पाणी बाहेर येत होते. त्या निरीक्षणातुन ती व्यक्ती बेल पाल्सी पक्षाघाताने त्रस्त असल्याचे समोर आले. कोरोनाचे रुग्ण या व्हायरल संसर्गाचे बळी ठरत आहेत. अशी ही काही प्रकरणे आहेत ज्यात त्यांना कोरोना होऊन गेल्याचे माहित ही नव्हते. अँटीबॉडीज चाचणी दरम्यान त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. पहिल्या लाटेतही त्यांना बेल पाल्सीची प्रकरणे आढळली होती परंतु कोविडनंतर दुसऱ्या लाटेत ही प्रकरणे वाढली आहेत.

bells palsy decease
स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला फडके वाडा पुनर्जीवित

न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल वेंकीटाचलम यांनी सांगितले की, पहिल्या लाटेपेक्षा बेल पाल्सीचे अधिक रुग्ण दुसऱ्या लाटेमध्ये आढळून येत आहेत. आधी महिन्याला एक किंवा दोन रुग्ण आढळले होते, परंतु आता हा आलेख वाढला आहे. कधीकधी आठवड्यात 5 ते 6 रुग्ण येतात. यासाठी घाबरण्याची गरज नाही, पण, रुग्णांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

उपचार काय ?

बेल पाल्सीच्या रुग्णांना स्टिरॉइड्स दिले जातात आणि वेळोवेळी चेहऱ्याची मालिश केल्यास रुग्ण लवकर बरे होतात. जर कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना अशी लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. सुरुवातीला ह अर्धांगवायू लवकर बरा होतो. विलंबाने त्याच्या जलद रिकव्हरीची शक्यता फारच कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com