राजकारणीच नियमांची चौकट ओलांडतात; नागरिकांनी काय आदर्श घ्यावा ?

corona rules
corona rulessakal media

मुंबई : कोविडच्या तीसऱ्या लाटेचा (corona third wave) इशारा आहे. कार्यालये, लग्नसोहळे, मॉल्स सर्वांसाठी नियमावली (corona rules) केलेली आहे. नोकरदार लोकल प्रवास (train traveling) करता यावा म्हणून लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत (waiting for second dose) रोज दोन तीन तासाचा प्रवास करत कार्यालय गाठत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या यात्रा सुरु आहेत तर राज्यकर्त्यांच्या उदघाटनाचा धुमधडका (political events) सुरु आहे. कोविडच्या नियमावलीच्या चौकटीत सामान्यजन अडकलेले असताना राजकरणीच ही चौकट ओलांडत (politician breaks rules) आहेत. त्यामुळे आता सामान्यांनी काय आदर्श घ्यावा हा प्रश्‍न आहे.

corona rules
भिवंडी रोड स्थानकातून १३ लाख पॅकेजेस पार्सल; ऑनलाईन शॉपिंगला चालना

या गर्दीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच रविवारी कान टोचले आहेत.त्यामुळे आता उदघाटने,पाहाणी दौऱ्यांसाठी होणाऱ्या गर्दीला लागम बसेल का हे बघण्या सारखे आहे. कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही.गेल्या काही दिवसात निर्बंध शिथील झाले आहेत.मात्र,अनेक निर्बंध आजही लागू आहेत.मात्र,मुंबई महानगर पालिकेची रोजच्या रोज उदघाटने सुरु असून त्यासाठी गर्दीही जमत आहे.गेल्या आठवडाभरात कलिना येथील कोविड केंद्र,शिवडी येथील दवाखाना,भांडूप प्रसुतीगृहातील शिशू अतिदक्षता विभाग,दादर येथील पहिले वाहान चार्जिंग स्टेशन अशी विविध उदघाटने झाली आहेत.यासाठी गर्दीही चांगली जमली होती.मुंबई महानगर पालिकेची उदघाटने सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला भाजपचही यात्रेच्या निमीत्ताने गर्दी जमवत आहे.

रस्त्यावर आणि उदघाटनांना होणाऱ्या गर्दीवर रविवारी उध्दव ठाकरे यांनीच कान टोचले.राजकीय,सामाजिक,धार्मिक व इतर कार्यक्रम करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने महाग पडू शकते.असा टोला भाजपला लगावला.तर,कलिना येथील लहान मुलांच्या कोविड केंद्राच्या उदघटनाला झालेल्या गर्दीवरुन त्यांनी स्वपक्षीयांचेही कान टोचले."आता सुध्दा मी गर्दी बधितली.ही गर्दी योग्य नाही'.अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वपक्षीयांना समज दिला आहे.त्यामुळे यानंतर तरी पालिकेच्या उदघाटनाला होणाऱ्या गर्दीला आवर बसेल का हे बघण्या सारखे आहे.

corona rules
गजानन काळेचा अटकपुर्व जामिन न्यायालयाने फेटाळला

"सामान्यांनाच नियमांची चौकट घालून दिली जात आहे.मात्र,राजकीय पक्षच नियम पाळत नाही.मग,सामान्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा.उदघाटने,यात्रा टाळण्या सारखे आहेत.सामान्यांना सुविधा उपलब्ध करुन देताना उदघाटनाला गर्दी करण्याची गरज काय"

.-विद्या वैद्य,वांद्रे

"राजकीय पक्षांनीही नियम पाळणे गरजेचे आहे.सरकारनेच हे नियम बनवले आहेत.तेही पाळत नसतील तर सामान्यांकडून कशी अपेक्षा करणार.सुविधा सुरु करताना उदघाटन करायचेच असेल तर कमीत कमी लोकांच्या उपस्थीतीत करता येईल."

-निखील देसाई,माटूंगा

"सामान्य नागरीक लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतिक्षा करतोय जेणेकरुन त्याला लोकलचा प्रवास करता येईल.आमच्या कडून नियम पाळण्याची अपेक्षा केली जात असताना राज्यकर्त्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.अन्यथा नागरीक कशी साथ देतील"

-गॉडफ्री पिमेंटो,मरोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com