esakal | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दीड पट रुग्ण अधिक वाढतील ; तज्ज्ञांचा अंदाज | Corona
sakal

बोलून बातमी शोधा

 corona active patients

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दीड पट रुग्ण अधिक वाढतील ; तज्ज्ञांचा अंदाज

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : दुसऱ्या लाटेच्या तुलनेत संभाव्य तिसऱ्या लाटेत (corona third wave) दिड पट रुग्ण अधिक आढळतील (corona patients increases) असा अंदाज तज्ज्ञांनी (experts opinion) व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारत सरकारच्या (Indian government) सार्वजनिक आरोग्य विषयक तज्ज्ञांनी भारतात आणि राज्यात कोविड आजाराची तिसरी लाट येण्याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा: केसरी शिधापत्रधारकांना दिवाळीसाठी धान्य स्वस्तात द्या- अतुल भातखळकर

प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळी सर्वाधिक रुग्ण कधी होते त्याची नोंद घेऊन त्याच्या दीडपट रुग्ण तिसऱ्या लाटेमध्ये आढळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे, राज्य सरकारने सर्वतोपरी तयारी सुरु केली आहे. या एकूण रुग्णांपैकी 65 टक्के रुग्ण हे घरगुती विलगीकरणात असतील त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याची गरज भासणार नाही. 35 टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची आवश्यकता भासेल या 35 टक्के रुग्णांपैकी 17.5 टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतील तर, 17.5 टक्के रुग्ण सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेतील.

या  17.5 टक्के रुग्ण संख्येस आठ टक्के रुग्णांसाठी समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये डीसीएच खाटा उपलब्ध करण्यात येतील. चार टक्के व्हेंटिलेटर आणि चार टक्के ऑक्सिजन बेड्स असे हे प्रमाण असेल. तसंच, या रुग्णांसाठी 32 टक्के ऑक्सिजन बेड निर्माण करण्यात येतील. त्यासाठी आठ टक्के ऑक्सिजन बेड्स समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये डीसीएच तर 24 टक्के ऑक्सिजन बेड हे समर्पित कोविड आरोग्य केंद्रात डीसीएचसी असतील.

लहान मुलांसाठी ही तयारी

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय असेल अंदाज लक्षात घेता लहान मुलांसाठी काही खाटा आरक्षित करण्यात येतील. समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये पाच टक्के, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये दहा टक्के आणि समर्पित कोविड निगा केंद्रात 15 टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. ऑक्सिजन वितरणासाठी ऑक्सिजनची उपलब्धता ऑक्सिजन जनरेशन ऑक्सिजन स्टोरेज या दोन प्रकारे करण्यात येणार आहे.

हेही वाचा: देवी हाच आमच्या जगण्याचा आधार

कोविड 19 उपचारांसाठी एकूण सुविधा

एकूण संस्था - 6,726

विलगीकरणासाठी एकूण खाटा - 4,66,451

ऑक्सिजन खाटा - 1,21,338

आयसीयु खाटा - 35,555

व्हेंटिलेटर खाटा - 13,844

बाल रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा

एकूण संस्था - 6,726

विशेष बाल रुग्णालये ( स्टँडअलोन) - 113

विलगीकरणासाठी एकूण खाटा - 26,720

ऑक्सिजन खाटा - 9,050

नवजात शिशु एनआयसीयू - 1,160

बालकांसाठी ( पीआयसीयु) - 2,335

एकूण - 3,495

व्हेंटिलेटर खाटा - 1188

loading image
go to top