esakal | केसरी शिधापत्रधारकांना दिवाळीसाठी धान्य स्वस्तात द्या- अतुल भातखळकर - Atul bhatkhalkar
sakal

बोलून बातमी शोधा

atul bhatkhalkar

केसरी शिधापत्रधारकांना दिवाळीसाठी धान्य स्वस्तात द्या- अतुल भातखळकर

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : कोरोनाकाळात (corona) आणि नैसर्गिक आपत्तीकाळात (Natural calamaties) पिचलेल्या नागरिकांना मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने (mva Government) आता गरीब शिधापत्रिका धारकांना (Poor people) दिवाळीत तरी साखर, तेल, धान्य (Grocery rates) अल्पदरात द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते व आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी केली आहे.

हेही वाचा: आणखी एक हजार कोटींची रस्ते दुरुस्ती; म्हाडा वसाहतीतील रस्त्यांसाठी ३०० कोटी

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक अडचणीतून राज्यातील जनता अद्याप बाहेर पडलेली नाही. त्यातच मुंबई, कोकण व आता मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे अतीव नुकसान झाले आहे. दोन वेळचे अन्न मिळण्यासाठी सुद्धा अनेक परिवारांची परवड होत आहे. कोरोनाच्या काळात एका रुपयाची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने किमान आता तरी राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता सर्व केसरी शिधापत्रिकाधारक परिवारांना तेल, साखर यासह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशभरातील सुमारे 80 कोटी नागरिकांना गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून वर्षभर मोफत अन्नधान्य देण्याचे काम केंद्र सरकारने केले. एक वर्षासाठी आणलेली हि योजना, देशभरातील लोकांची गरज लक्षात घेता केंद्राने दिवाळीपर्यंत वाढवली आहे. तसेच काम राज्याने करून गरिबांना दिलासा द्यावा, असेही भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: डहाणूत मालगाडीचा डबा घसरला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी राज्यातील सात कोटी नागरिकांना राज्य सरकारकडून एका महिन्याचे धान्य मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी. परंतु केंद्र सरकारकडून गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून झालेल्या धान्य पुरवठ्यामुळे राज्य सरकारने घोषणा करूनही मोफत धान्य वाटप केले नाही. कोरोनाच्या काळात एका रुपयाचे सुद्धा पॅकेज जाहीर न करणाऱ्या ठाकरे सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मुंबईकरांना तसेच कोकणातील नागरिकांनाही मदत केली नाही. किमान आतातरी आपल्या राज्याची तिजोरी मोकळी करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मदत करावी असे भातखळकर यांनी सुनावले आहे.

loading image
go to top