esakal | कोरोनामुक्त नागरिकांच्या सांधेदुखी, श्वसनविकारांमध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patient

कोरोनामुक्त नागरिकांच्या सांधेदुखी, श्वसनविकारांमध्ये वाढ

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून (corona) बाहेर पडत नाही तर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) येणार असे भाकीत आरोग्य तज्ञांकडून (health authorities) केले जात असून कोरोनामुक्त (corona free patient) झालेल्या नागरिकांमध्ये सांधेदुखी, श्वसनविकार तसेच शारिरीक आणि मानसिक थकवा वाढल्याचे (Health problems) दिसून आले आहे. एका खासगी रुग्णालयात कोव्हीडमुक्त नागरिकांसाठी मोफत तपासणी शिबीर (Health camp) ठेवले होते. या शिबिरात चाळीसहुन अधिक नागरिकांनी भाग घेतला होता.

हेही वाचा: BMC : मुंबईत कोरोना लसीकरण उद्या बंद

शंभरातील 20 नागरिकांना त्रास

फिजियोथेरेपिस्ट डॉ. माधवी डोके यांनी सांगितले की, " पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना झालेल्या नागरिकांना विविध प्रकारच्या समस्या होत असून यातील मुख्य समस्या म्हणजे सांधेदुखी असून शंभरातील वीस नागरिकांना याचा त्रास होत आहे. अनेक कोरोनामुक्त नागरिकांना घरी गेल्यानंतरही त्यांना अस्वस्थ वाटत असून सांधेदुखी, स्नायूदुखी, थकवा येणे, या आणि अशा बऱ्याच तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जात आहे. सांधेदुखीच्या समस्येत नक्कीच वाढ झाली आहे. लॉकडाउनमुळे शरीराची थांबलेली हालचाल, कॅल्शियमची कमतरता, कोरोनामुळे आलेला अशक्तपणा, वाढत्या वयानुसार आलेला थकवा अशी अनेक करणे  सांधेदुखीची असू शकतात परंतु याचे योग्य निदान होणे गरजेचे आहे.

उपचार काय ?

सांधेदुखीवर रामबाण उपाय म्हणजेच फिजियोथेरेपी हाच आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनामुक्त झालो म्हणजे आजारमुक्त झालो असा गैरसमज करून घेऊ नये कारण कोरोनाच्या संक्रमणामुळे शरीरातील अनेक पेशीचे नुकसान झालेले असते, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित उपचार करणे गरजेचे आहे. नियमित फिजिओथेरपीमुळे आजार, दुखापत किंवा विकारांमुळे होणार्‍या त्रासांपासून सर्व वयोगटातील लोकांना दिलासा मिळू शकतो.

loading image
go to top