मुंबईत कोरोनाचं तांडव कायम, मुंबईत वाढलेत 'इतके' रुग्ण; मुंबईची रुग्णसंख्या ३६ हजारांच्या पार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हजारच्या खाली येण्यास तयार नसून  आजही 1437 नवीन रुग्ण आढळले.

मुंबई : मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हजारच्या खाली येण्यास तयार नसून  आजही 1437 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 36,710 झाली आहे. मुंबईत आज 38 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 1173 झाली  आहे.

मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज मुंबईत 715 रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या आता  16,008 झाली आहे.

BIG NEWS - Coronavirus : पावसाळ्यापूर्वी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय...

मुंबईत आज 38 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1173 वर पोचला आहे.आज झालेल्या 38 मृत्यूंपैकी 28 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 22 पुरुष तर 16 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली आहे. तर 20 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. तर 16 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

दरम्यान कोरोना संशयित रुग्णांमध्ये देखील वाढ झाली असून आज एकूण 832 नवे संशयित रुग्ण आढळले. आतापर्यंत 29,386 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

SRPF च्या 17 जवानांवर गुन्हा दाखल, कोरोनाच्या काळात केला 'हा' प्रकार...

मुंबईत मेगालॅब 

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनाच्या निदानासाठी आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलतर्फे मुंबईत मेगालॅब उभारण्यात येणार आहे. या लॅबमध्ये दर महिन्याला 1 कोटी चाचण्या केल्या जाणार आहेत. कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारामुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांचीही येथे तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे सहकार्य लाभणार आहे. या मेगालॅब साठी जागा लवकरच निश्चित होणार आहे.

corona count increased by more than 1400 patients once again in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona count increased by more than 1400 patients once again in mumbai