नवी मुंबईत कोरोनाचा भडका; एकाच दिवसात आढळले 'इतके' रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. अशात नवी मुंबईत एकाच दिवशी कोरोनाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं.

नवी मुंबई : कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. अशात नवी मुंबईत एकाच दिवशी कोरोनाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबईत एकाच दिवशी 43 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आता नवी मुंबईची कोरोना रुग्ण संख्या 188 वर पोहचली आहे. सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तुर्भे आणि एपीएमसी मार्केटमधील असल्यामुळे मार्केटच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

कोरोना विषाणूचा नवा 'A2a' अवतार समोर; येत्या काळात अधिक घातक ठरू शकतो कोरोना...

महापालिकेच्या आरोग्य विभागाला आज 258 अहवाल प्राप्त झाले. या अहवालांपैकी 215 अहवाल निगेटिव्ह, तर 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात आढळलेले 43 रुग्णांपैकी 16 रुग्ण एकट्या तुर्भे भागातील असल्याची नोंद झाली आहे. 

विभागवार रुग्णांची संख्या

  • बेलापूरमध्ये 1
  • नेरूळ 2
  • वाशी 5
  • तुर्भे 16
  • कोपरखैरणे 9
  • घणसोली 7
  • ऐरोली 3

APMC मार्केट येथील हॉटेलमधील कोरोनाबाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना संसर्ग झाला आहे. तर घणसोली येथील कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना लागण झाली आहे. वाशीतील हिरानंदानी - फोर्टिज रुग्णालयात डायलिसीस करण्यासाठी गेलेल्या दोन वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे.

मोठी बातमी - मेहुस चोक्सी यासह अनेक कर्जबुडव्यांचे 68 हजार कोटी रुपये माफ

अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, त्या भागातील रस्ते बंद करण्याचे आदेश महापालिकेतर्फे पोलिसांना दिले आहेत.

त्या डिलिव्हरी बॉयच्या संपर्कातून दोघांना संसर्ग :
जुहू गावातील कोरोनाबाधित डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा सध्या शोध सुरू आहे. अशाच एका संपर्कात आलेल्या व्यक्तीला संसर्ग न होता थेट त्याच्या पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

corona count in navi mumbai increased 43 new patients detected in navi mumbai

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona count in navi mumbai increased 43 new patients detected in navi mumbai