मोठी बातमी - मेहुस चोक्सी यासह अनेक कर्जबुडव्यांचे 68 हजार कोटी रुपये माफ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

रिझर्व्ह बँकेने राईट ऑफ केलेल्या कर्जाची एकत्रित रक्कम 68 हजार 607 कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात  आयटी,पायाभूत क्षेत्रातील कंपनी, सोने-हिऱे दागिने आणि औषधनिर्माण कंपन्यांचा समावेश आहे.

मुंबई. ता.28: देशातील एकुण 50 कर्जबुडव्याचे सुमारे 68 हजार कोटी रुपयाच्या कर्जावर रिझर्व बँकेने पाणी सोडले आहे. एका माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जमाफ  झालेल्या उद्योगतींच्या यादीत परदेशात पळालेला हिरे व्यापारी मेहूल चोक्सी, विजय माल्या,जतिन मेहता याचा समावेश आहे.या यादीमध्ये बाबा रामदेव यांच्या एका कंपनीलाही कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे  या माहितीतून उघड झालं आहे. 

रिझर्व्ह बँकेने राईट ऑफ केलेल्या कर्जाची एकत्रित रक्कम 68 हजार 607 कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात  आयटी,पायाभूत क्षेत्रातील कंपनी, सोने-हिऱे दागिने आणि औषधनिर्माण कंपन्यांचा समावेश आहे.

...हातात नाही पैसे, खिन्न मनाने आता 'त्याही' म्हणतायत "मॅडम काम पर आऊ क्या?"

काँग्रेस खासदार राहूल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता.मात्र केंद्र सरकारने ही माहिती उघड करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली आहे. या सर्वांची कर्जे 30 सप्टेंबर 2019 ला माफ केल्याची कबूली रिझर्व बँकेने दिली आहे.  सुप्रीम कोर्टाच्या नियमाचा हवाला देत परदेशी कर्जदारांबद्दल कुठलीही माहिती देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे.

Big Breaking : चिंता वाढली, आता मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्येही कोरोनाचा शिरकाव

टॉप कर्जबुडव्यांची नावे आणि बुडालेली रक्कम : 

  • मेहुस चोक्सी, गितांजली जेम्स लिमिटेड - 5492 कोटी 
  • संदिप झुनझुनवाला, आरईआय एग्रो ,  - 4314 कोटी
  • जतिन मेहता, विन्सम डायमंड- 4076 कोटी 
  • कोठारी बंधू, रोटोमॅट ग्लोबल प्रायवेट लि- 2850 कोटी 
  • विजय माल्या, किंगफीशर एयरलाईंस लिमीटेड- 1,943 कोटी 
  • कुडोस केमी - 2,326 कोटी
  • पंतजली आयुर्वेद, रुचि सोया इंडस्ट्रीज- 2,212 कोटी 
  • झूम डेवलपर्स प्राइवेट लिमिटेड,- 2,012 कोटी रुपये

परदेशात पळून गेलेले उद्योगपती

कर्जमाफी पदरात पाडून घेतलेल्यांमध्ये आघाडीवर असलेला गीतांजली जेम्स आणि गिली इंडिया लिमिटेड, नक्षत्र बॉड्स या कंपन्याचा मालक मेहूल चोक्सी सध्या बारबाडोस इथ राहत आहे. विनसम डायमंडचा मालक जतिन मेहता देशाबाहेर पळून गेला आहे. किंगफीशरचा मालक विजय माल्या सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहे.

१२ तास ड्युटी आणि २४ तास आराम; पोलिसांना पाळावे लागणार 'हे' नवीन नियम

बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी याबाबत माध्य केलंय, ते म्हणालेत, "रिझर्व बँकेच्या माहितीत केवळ राईट ऑफ केलेली रक्कमेची माहिती दिली आहे. मात्र मूळ कर्ज, वसूल न झालेली रक्कम  बघता, ही रक्कम केवळ हिमनगाचे एक टोक आहे. या बँकानी प्रत्यक्ष उचलेली रक्कम खूप मोठी आहे.त्याची माहिती रिझर्व बँकेने दिली नाही. ही बँकेच्या ठेविदारांची सरळसरळ लूट आहे."

RBI waves off loans taken by mehun choksi and many big defaulters


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI waves off loans taken by mehun choksi and many big defaulters