दिलासादायक ! आता वीजबिल भरण्यास उशीर झाला तरीही कनेक्शन कापलं जाणार नाही, दंड देखील नाही

दिलासादायक ! आता वीजबिल भरण्यास उशीर झाला तरीही कनेक्शन कापलं जाणार नाही, दंड देखील नाही

मुंबई - जगातील इतर देशांसारखी महाराष्ट्रावर देखील कोरोना व्हायरसची टांगती तालावर आहे. अशात केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतण्यात आलाय. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या नवीन निर्णयानुसार वीजबिल भरण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणावी असे आदेश सर्व वीज वितरक कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमच्या वीजबिल भरण्यात उशीर झाला तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही आणि तुमची वीज देखील कापली जाणार नाहीये.

यासंदर्भात एका पत्रद्वारा केंद्रीय ऊर्जामंत्रालयाकडून प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याना आणि मुख्य सचिव यांना कळवण्यात येत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री राज कुमार सिंह यांच्या माहितीप्रमाणे सर्व राज्यातील वीज कंपन्यांना पुढील तीन महिने वीज मिळणार आहे, जेणेकरून सर्व वीज ग्राहकांना पुढील तीन महिने अखंडित वीज पुरवठा सुरु राहू शकणार आहे.

ज्याप्रकारे ज्याप्रकारे RBI कडून EMI गोळा करू नये असे निर्देश बँकांना देण्यात आलेत, त्याचप्रमाणे सर्व वीज कंपन्यांना वीज ग्राहकांकडून पुढील तीन महिने वीजबिल भरण्यास उशीर झाला तर त्यांची वीज कापली जाऊ नये आणि वीजबिलावर कोणताही दंड आकारू नये असं सांगण्यात आलंय.    

महाराष्ट्रात विजेचे दर होणार कमी : 

महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने महाराष्ट्रात वीज देणाऱ्या विविध कंपन्यांना विजेचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य वीज नियामक मंडळाकडून दरवर्षी विजेचे दर निश्चित केले जातात. अशात  यंदाचे महाराष्ट्रातील विजेचे दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती, औद्योगिक आणि शेतीला देण्यात येणाऱ्या वीज पंपांच्या विजेच्या दरात दहा ते १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. पुढील ३ ते ५ वर्षांसाठी ही कपात करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे तुमचं आमचं विजेचं बिल आता कमी येणार आहे.  महाराष्ट्रातील जनतेला याचा लाभ होऊ शकतो.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com