esakal | मराठी तरुणांची आणखी एक उत्तम निर्मिती; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला मदत होतेय 'या' दोन ऍप्सची
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी तरुणांची आणखी एक उत्तम निर्मिती; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला मदत होतेय 'या' दोन ऍप्सची

विकास औटे आणि मोहित तोडकर या दोघं तरुणांची 'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' हे दोन ऍप्लिकेशन विकसित केलंय. याचा वापर सध्या काही महापालिका करत आहेत. होम क्वॉरन्टाईन रूग्णांना हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या रुग्णांशी नियमित संपर्क साधता येणार आहे.

मराठी तरुणांची आणखी एक उत्तम निर्मिती; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला मदत होतेय 'या' दोन ऍप्सची

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : इतर देशांसारखा कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढू नये म्हणून केंद्र सरकारनं परदेशातून आलेल्या  अनेकांना अनेकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही लोकांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार अनेक जण आपल्याच घरात सेल्फ क्वॉरंटाईन आहेत. मात्र शासनाला क्वॉरंटाईन केलेल्या प्रत्येक व्यक्तीवर वयक्तिकरित्या लक्ष ठेवणं अवघड जात होतं. त्यामुळे महापालिकांच्या मदतीसाठी हे दोन तरुण धावून आले आहेत. क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी तयार केलेलं मोबाईल ऍप अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. 

मोठी बातमी -  मुंबईतील वरळी कोळीवाडा केला सील, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबापासून वेगळं राहायला सांगण्यात आलंय. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांना जर १४ दिवसांत कोरोनाची लक्षणं आढळली तर त्यांना रुग्णालयात दाखल करावं अशी देखील तरतूद आहे. मात्र हे १४ दिवस या करण्यात क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या लोकांची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आता महापालिका 'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' अश्या दोन  ऍप्सची मदत घेणार आहे. त्यामुळे महानगरपालिकांना या लोकांवर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे.

विकास औटे आणि मोहित तोडकर या दोघं तरुणांची 'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' हे दोन ऍप्लिकेशन विकसित केलंय. याचा वापर सध्या काही महापालिका करत आहेत. होम क्वॉरन्टाईन रूग्णांना हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या रुग्णांशी नियमित संपर्क साधता येणार आहे.

मोठी बातमी - मुंबईत लष्कर दाखल झाल्याची पसरवली अफवा; पोलिस आले बेड्या घेऊन आणि...

हे आहेत  'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' चे फायदे 

  • आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांना आता होम क्वॉरन्टाईन असलेल्या लोकांच्या आरोग्याची माहिती मिळणार आहे.
  • लोकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
  • कोरोना व्हायरससंदर्भात कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर याचा फायदा होणार आहे.
  • अशा रुग्णांच्या संपर्कात राहण्यासाठी हे माध्यम ठरणार आहे.
  • यामुळे नागरिकांच्या आरोग्याची आकडेवारी मिळू शकणार आहे.
  • आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना यामुळे २४ तास ही माहिती मिळवता येणार आहे.
  • क्वॉरन्टाईन असलेल्या रुग्णांनाही याद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.
  • रुग्णाला रुग्णालयांमध्ये भरती करत असताना देखील या अ‍ॅप्लिकेशनची मोठी मदत होणार आहे.
  • या अ‍ॅपमध्ये ऑनलाईन वैयक्तिक चॅटची सुविधाही देण्यात आली आहे.

मोठी बातमी -  सिनियर सिटिझनन्स 'या' पदाथांचं सेवन करून वाढवू शकतात रोगप्रतिकारक क्षमता...

या अ‍ॅप्लिकेशनची लिंक प्रत्येक सोसायटीच्या प्रतिनिधींना पाठवली जाणार आहे. ज्याद्वारे त्यांच्या सोसायटीतल्या लोकांची माहिती त्यांना आरोग्य विभागाला द्यावी लागणार आहे. ज्यामुळे महानगरपालिका आवश्यक असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकेल. नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल महानगरपालिकांनी याचा वापर सुरू केला आहे. आता कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि इतर महानगरपालिकाही याचा वापर करणार आहेत.

two marathi youngsters made an app that is helping municipal corporation to fight against corona