कोरोनाचा दहिहंडी उत्सवाला फटका ; लाखो रुपयांच्या उलाढालीवर परिणाम 

मटाका विक्री अलिबाग
मटाका विक्री अलिबाग

अलिबाग ः कोरोनामुळे रायगड जिल्हयातील अनेक व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला असताना, जिल्हयातील मडका विक्री व्यवसायिक ही या संकटातून सुटलेला नाही. दहिहंडी फोडण्याचा सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र कोरोनामुळे सुमारे 60 टक्के मडका विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या उलाढालीवर त्याचा परिणाम झाल्याचे मडका विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. 
 रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणात मडका तयार करण्याचे काम कुंभार समाज करीत असतात. याच व्यवसायावर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.

मातीचे मडके, चुली अशा अनेक वस्तू तयार करण्याचे काम हा समाज करीत आहे. परंपरागत असलेल्या या व्यवसायाला काही ठिकाणी आधुनिकतेची जोडही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चक्राऐवजी आता विजेवर चालणाऱ्या यंत्राद्वारे काही ठिकाणी मडके तयार करण्याचे काम केले जाते. माती व तूस विकत आणून मडके तयार करण्याचे काम केले जाते. कृष्ण जन्माष्टमीनंतर गोपाळकाला या दिवशी दहीहंडी फोडल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मडका विक्री होते. लाखो रुपयांची उलाढाल या कालावधीत होते. परंतु यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

त्यामुळे मडक्‍याच्या विक्रीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. तयार केलेले मडके पडून असल्याचे मडका तयार करणाऱ्यांबरोबरच विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या वर्षी फक्त 40 टक्केच विक्री झाली असून 60 टक्के विक्रीत घट झाली असल्याचे मडका विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. 

मडके तयार करून ठेवले आहेत. परंतु ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मडके विक्रीवर त्याचा परिणाम झाला असल्याने मोठे आर्थिक संकटात हा व्यवसाय सापडला आहे. 
- गणपत भोईलकर, कारागिर व विक्रेते 

(संपादन ःरोशन मोरे) 
 
Corona Effects on pot sales

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com