ठाणे पोलिस दलात कोरोनोचा शिरकाव?  कोरोना संशयीत अधिकारी रूग्णालयात दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामध्ये कोरोनासदृश्‍य लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी ते कर्तव्य बजावत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ते सुट्टी घेऊन नाशिक येथे गेले होते. तेथे त्रास वाढू लागल्याने तातडीने त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली किंवा नाही, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. 

ठाणे: ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामध्ये कोरोनासदृश्‍य लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी ते कर्तव्य बजावत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ते सुट्टी घेऊन नाशिक येथे गेले होते. तेथे त्रास वाढू लागल्याने तातडीने त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली किंवा नाही, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ठाण्यानजीकच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या किंबहुना, संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात तबलिगी जमातीसह, बांगलादेशी आणि मलेशियातील नागरिक वास्तव्यास आले होते. त्यांना शोधून काढण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला अचानक रक्तदाब आणि इतर शारीरीक त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी सुट्टी घेऊन थेट नाशिक येथील घर गाठले. तेथे कुटुंबियांसमवेत असतानाच अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या पोलिस अधिकाऱ्याचा वैद्यकिय अहवाल अद्याप आला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे काही कालावधीत वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांचीही चिंता यामुळे वाढली आहे.

Corona enter in Thane police force?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona enter in Thane police force?