esakal | Big Breaking : चिंता वाढली, आता मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्येही कोरोनाचा शिरकाव
sakal

बोलून बातमी शोधा

Big Breaking :  चिंता वाढली, आता मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्येही कोरोनाचा शिरकाव

मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टी परिसरात मंगळवारी (ता.28) कोरोना रुग्ण आढळला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Big Breaking : चिंता वाढली, आता मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्येही कोरोनाचा शिरकाव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई, मानखुर्द, ता.28 : मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टी परिसरात मंगळवारी (ता.28) कोरोना रुग्ण आढळला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधिताला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या कुटुंबियांना पालिकेने विलगीकरण कक्षात पाठवले आहे. त्यांच्या झोपडीच्या आजूबाजूचा परिसर पालिकेने ताबडतोब प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यालगत मंडाळा झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीतील एकता नगरच्या रोड क्रमांक दोन परिसरातील नागरिकाला मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. झोपडपट्टी असल्यामुळे चिंचोळ्या गल्ल्यांमधील अरुंद झोपड्यांमध्ये दाटीवाटीने नागरिक राहतात. या दाट वस्तीमध्ये कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासनासमोरील आव्हान आणखी वाढले आहे.

तिसरा Lockdown ?  गृहमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत...

निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय दोन दिवस बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकर करण्यात येणार आहार. त्यासाठी दिनांक 29 व 30 एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम 29 व 30 एप्रिल रोजी  करण्यात येणार आहे.

१२ तास ड्युटी आणि २४ तास आराम; पोलिसांना पाळावे लागणार 'हे' नवीन नियम

corona entered in mandala slums near mandhurd read full story

loading image
go to top