esakal | १२ तास ड्युटी आणि २४ तास आराम; पोलिसांना पाळावे लागणार 'हे' नवीन नियम
sakal

बोलून बातमी शोधा

१२ तास ड्युटी आणि २४ तास आराम; पोलिसांना पाळावे लागणार 'हे' नवीन नियम

कोरोनाच्या गंभीर संकटातही मुंबई पोलिस आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका आता मुंबई पोलिसांनाही बसू लागला आहे.

१२ तास ड्युटी आणि २४ तास आराम; पोलिसांना पाळावे लागणार 'हे' नवीन नियम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई:  कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे. लोकं आपल्या घरी राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मात्र डॉक्टरांच्या,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या नशिबात हे सुख नाहीये. कोरोनाच्या गंभीर संकटातही मुंबई पोलिस आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका आता मुंबई पोलिसांनाही बसू लागला आहे. काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांना नियमावली देण्यात आली आहे यामुळे पोलिस अधिक सुरक्षित राहू शकणार आहेत. 

कोरोनावरील अंतिम पर्याय 'हर्ड इम्युनीटी'चा ? पण, 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे काय रे भाऊ?

नियमावलीतले काही महत्वाचे मुद्दे:

 • ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 • डायबिटीज असलेल्या ५२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांनाही घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  
 • सर्व पोलिस स्टेशनच्या पोलिसांना ३ मेपर्यंत १२ तास ड्युटी आणि २४ तास आराम अशा शिफ्टमध्ये काम करावं लागेल.
 • १२ हजार पोलिसांसाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 • २० हजार पोलिसांना मल्टीव्हिटॅमिन आणि प्रोटीनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.
 • पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यावस्था करण्यात आली आहे.
 • पोलिसांसाठी वेगळ्या प्रकारचे कोव्हीड नंबर देण्यात आले आहेत. ज्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची मेडिकल सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.

तिसरा Lockdown ?  गृहमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत...

 • PPE आणि इतर काही सुरक्षेच्या वस्तूंना पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.
 • चेक पॉईंटवर त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि धान्याची व्यवस्था केली गेली आहे.
 • ज्या पोलिसांचं घर दूर असल्यामुळे ते ड्युटी संपवून घरी जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी राहण्याची सोय करण्यात अली आहे.
 • कोरोना व्हायरसमुळे ज्या पोलिसांचं निधन झालं त्यांना ५० लाख रुपये दिले जाणार आहेत.
 • पोलिसांसाठी काहीसे दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे पोलिस कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकणार आहेत.

new guidelines issued to cops in mumbai during lockdown read full list

loading image
go to top